एवढे एक करशील ना ?
शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना ?
माझ्याही नकळत दुखावले तुला तर माफ़ मला करशील ना ?
ओघळले अश्रु माझे तर अलगद टिपून घेशील ना ?
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?
चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना ?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना ?
कितीही भांडलो आपण तरीही समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?
मी आता विसरणे शक्य नाही तुला तू मला लक्षात ठेवशील ना ?
जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?
मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ?
आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?
तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो तरी माझ्यासाठी……….
तूच एक असशील ना ?
Post a Comment Blogger Facebook