खरे सांग ना रे तुझ्या मनात काय आहे !
रात्रीत दडलेली पहाट आहे की
मुठीत दडविलेली इवलिशी अत्तराची कुपी आहे
सांग ना रे तुझ्या मनात काय आहे........


मी म्हणाले हो तर तू नाही म्हणतोस
मी नाही म्हंटले की तू हो म्हणतोस
आपले एकाच गोष्टीवर एकमत केव्हा होणार आहे
सांग ना रे तुझ्या मनात काय आहे........

एकदा म्हणतोस तू माझी सर्वात चांगली
मैत्रिण आहेस
एकदा असे म्हणतोस की मला अशी हवी जिच्याशी
साता जन्माच्या गाठी बांधेन
सांग ना रे तुझ्या मनात काय आहे.............

कधी माझ्याकडे पाहून गोड हसतोस
तर कधी लटक्या रागाने पहातोस
सांग ना रे तुझ्या मनात काय आहे........

राग तर तुझ्या कायम नाकावर असतो
अणि गंमत म्हणजे हसुही कायम ओठावर असतं
पटकन चिडून रागवल्यावर
sorry पण लगेच म्हणायचे असतं
सांग ना रे तुझ्या मनात काय आहे........

Post a Comment Blogger

 
Top