मिठी...
पहिला पाऊस, पहिली सर
सोबत ती ही असावी
चिंब बाहूंच्या कवेत शिरण्या
मुंगीस जागा नसावी ॥ १ ॥
त्या रोमांचित धुंध क्षणी
मज विसर जगाचा पडावा
कडाडणारी मेघगर्जना
पण 'असर' तिचा ही न व्हावा ॥२॥
मिठीत माझ्या कळी उमलू दे
फुलू दे आणिक बहरू दे
मजसाठी सुख-स्वप्नांची दुनिया
तिच्या गालिची खळी असू दे ॥३॥
अखेर, तिजभोवतीच्या बाहूंची
अलगद मिठी सुटावी
जरी विभक्त होतील शरीरे
मनं मात्र ती गुंतून राहावी ॥४॥
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook