हे लक्षात घ्या !!

१.लोकांना अपेक्षे पेक्षा जास्त दया .. पण मनापासून .
आणि हे देणे  म्हणजे केवळ पैसा नाही.


२. नेहमी फक्त तुमच्या कानावरच  विश्वास ठेवू नका .. तेच तुमच्या पैशाचाही . खिशात  आहेत म्हणून सारे पैसे एकावेळी खर्च करू नका ..तेच तुमच्या झोपेचाही . मनात येईल तितका वेळ ताणून देऊ नका.

३. "सॉरी " म्हणायची वेळ आलीच तर मनापासून म्हणा ..सॉरी म्हणन म्हणजे पुन्हा ती चूक न करण्याचं वचन !


४.कुणाच्याही  स्वप्नाची चेष्टा करू नका. ज्यांच्या डोळ्यात स्वप्न नसतात , त्या माणसांच्या  आयुष्यात जगण्यासार्ख फारसं काही नसतं.

५. प्रेमात पडणारच असाल तर मनापासून पडा,पण प्रेम निभावणं सोप्पं नसतं . मनाच्या चिंध्या होतीलही कदाचित , पण आयुष्य समृद्ध करणारी प्रेमापेक्षा  मोठी दुसरी गोष्ट नाही.

६. वाद होणारच . पण ते करताना मुद्दा सोडून आरोप करू नका . आरडाओरडा , आरोप म्हणजे वाद नव्हे . आपलं म्हणन शांतपणे मात्र ठाम राहून सांगता येतच.

७.पैशाने माणसं जोखू नका .. माणसाचं मोल जगात कशाहूनही जास्त असतं!.

८. जगात सोपं काहीच नसतं . मोठी स्वप्न पाहून मोठ यश मिळवायचं असेल  तर  मोठा धोका पत्करावाच लागतो.

९.नेहमीच यश कसं मिळेल ,कधीतरी हार पत्करावीच लागते . हार स्वीकारा , पण हरण्याचं दु:ख  विसरून जा ! लक्षात ठेवा त्या हरण्याने शिकवलेला धडा .

१०. छोटासा भांडण  झालं म्हणून जिवाभावाची मैत्री तोडू नका.


-
With Lots Of Love
Sachin Haldankar.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top