प्रेम नावाचा "टाईमपास"
त्याची अन तिची पहिली भॆट
दोघांची होणाऱी "नजऱभेट"
काळजाला जाऊन भिडणारी थेट
दोघांचं एकमेकांना पाहून हसणं
अन नाजुकशा जाळ्यात अलगद फसणं...
या हसण्या या फसण्याची
सवय झालीय सगळयांना...
नजऱभेटीचं रूपांतर चोरून भॆटीत
भेटीचं रूपांतर हळुवार मिठीत
अन त्याहीपुढे कित्येक पटीत
नात्यातल्या या वेगाची
सवय झालीय सगळयांना...
मग रंगू लागतात स्वप्नं
एक त्याचं,एक तिचं फक्त दोन मनं
त्याचं हसणं तेव्हा तिचं हसणं
तिचं रडणं तेव्हा त्याचं रडणं
या हसण्या या रडण्याची
सवय झालीय सगळयांना...
दिल्या जातात वेळा,पाळल्याही जातात वेळा
घेतल्या जातात शपथा दिल्या जातात उपमा
त्याला ती वाटते "रांझ्याची हीर"
तिलाही तो वाटतो "कपूरांचा रणबीर"
या शपथा या उपमांची
सवय झालीय सगळयांना...
मग येतो असाही एक दिवस
पूनवेची रात्र वाटू लागते अवस
दोघांनाही येऊ लागतो एकमेकांचा कंटाळा
हीर वाटू लागते "बधीर" अन
रणबीर वाटू लागतो चक्क "काळा"
या अवसेची या पूनवेची
सवय झालीय सगळयांना...
पहिल्या भेटीच्या चौकातच
फूटतात "नव्या वाटा"
दोघंही करतात एकमेकांना "टाटा"
अहो तु्म्ही कशाला होताय डिस्टर्ब
दुःख वैगरे विसरा
त्याला भॆटते दूसरी
तिलाही भॆटतो दूसरा
पुन्हा होते देवाणघेवाण,पुन्हा होते "दिलफेक"
पुन्हा जुन्या कहानीचा नव्याने "रिटेक"
बदलत्या प्रेमाच्या रंगाची
सवय झालीय सगळयांना...
खरं सांगायचं अगदी मनापासून तर
प्रेम नावाचा "टाईमपास" करण्याची
सवय झालीय सगळयांना....._,___
--
With Lots Of Love
Sachin Haldankar.
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook