तुळशी विवाह

तुळशी विवाह एका पुजोत्सव हरीविष्णूचा तुळशीशी विवाह लावणे असा याची विधी
आहे. विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशीवृंदावन सारून सुशोभित करतात.
वृंदावनात ऊस व झेंडूची फुलांची झाडे उभी करतात. तुळशीच्या मुळाशी चिंचा
व आवळे ठेवतात. तुळशी विवाह कार्तिकी एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत
कोणत्याही दिवशी करावा त्यात उत्तरा भाद्रपद, रेवती व अश्विनी ही
नक्षत्रे तुळशी विवाहाला श्रेष्ठ मानण्यात आले आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशी विवाह झाल्या नंतर चातुर्मासात जी व्रते
घेतलेली असतील त्या सर्वांच समाप्ती करतात. व चातुर्मासात जे पदार्थ
वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान करून मग स्वत: सेवन करतात.
तुळशी ‍ही घरोघरी असणारी एक अत्यंत पवित्र व उपयुक्त वनस्पती आहे.
प्रत्येक हिंदू कुटुंबीयांच्या घरासमोर वृंदावन असते. आजकाल जागेअभावी
वृंदावन बांधणे शक्य नाही म्हणून मातीच्या कुंडीत तुळशीचे रोप लावतात.
तुळशी ही कृष्णध्वज राजाची कन्येच्या अनुपम सौंदर्यामुळे तिला तुळशी हे
नाव पडते. तुळशीचे महत्त्व आणि माहात्म्य अनन्यसाधारण आहे. देवपूजा
श्राद्ध यासाठी तुळस अवश्य लागते. भगवान श्रीविष्णूस तुळस अत्यंत प्रिय
आहे. म्हणून तुळशीला हिरप्रिया म्हणतात. श्रीकृष्ण जीवनी, वृंदा,
वृंदावती, श्रीदेवी, नंदिनी, लक्ष्मी, महालक्ष्मी अशी ही तुळशीचे नावे
आहे.

तुळशीचे धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्वआरोग्य दृष्टाही तुळस मानवाला अतिशय उपायकारक ठरली आहे. तुळशीत कार्बोजिक
अ‍ॅसिड वायू शोषून घेऊन ऑक्सीजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त प्रमाणात
असल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास उपयोग होतो. दारात तुळशीचे झाड असेल की,
घरात पिसवा व हिवतापाचे जंतू सहसा शिरकाव करीत नाही. तुळशीपत्रांचा अर्क
बर्‍याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो.पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र गरजेचे
असते. त्याशिवाय देव प्रसाद ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते.
नवमी, दशमीचे व्रत व पूजा करून नंतरच्या दिवशी तुळशीचे रोप ब्राह्मणाला
दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पानी
देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. जेथे आहे तुळशीचे पान तेथे वसे
नारायण अशी संत बहीणा बाईने तुळशी महात्म्याची थोरवी गायली आहेत.

तुळशी व‍िवाह कसा करावा?


तुळशी व‍िवाहाच्या तीन महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला नियमित पाणी
घालून त्याची पूजा करावी.
मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा.
चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करा.
यानंतर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुळशीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस
आसनावर ठेवा.
यजमानाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसन ग्रहण करावे.
गोरज मुहूर्तावर (वराचे) देवाचे पूजन करावे.
मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे.
यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी.
नंतर वस्त्र व आभूषणे घालावित.
नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करावे.
शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा.

तुळशी विवाह व्रत कथा

कांचीनगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नांव
किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह
करेल त्याच्या अंगावर विज पडून तो मरेल. एका ब्राह्मणाने किशोरीला
व्दादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची
पूजा व कार्तिक शुध्द नवमीला विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी
सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली.


एकदा एक गंध्यानं तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिणीच्या
मदतीने त्याने स्त्री वेष घेऊन त्या माळिणी बरोबर तो किशोरीकडे आला. ती
माळिण म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला
देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. गंधा किशोरीकडे
दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हा ही किशोरीवर मोहित
झाला. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन
त्याला सांगितलं की, तू किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा विज
पडून मरेल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्या सारख्या देवाला तिचं वैधव्य
टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न् पाणी वर्ज्य करून मरून
जाईन. सूर्याने किशोरीच्या वडीलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र
मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजला हा विवाह मान्य करणं भाग पडलं.
कार्तिक व्दादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळलं. तो खूप
दु:खी झाला, व त्याने ठरवलं की, लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा
त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या किशोरीही भांबावून गेली व ती
बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर
विज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह
झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळलं.


तुळशी विवाहामागील अर्थ

तुळशीचे एक पान देवाच्या समकक्ष बसण्याचे सामर्थ्य ठेवते. तुळशी म्हणजेच
'तुलां सादृश्यंस्यति नाशयती इति तुलसी ।' देवाला पूर्णपणे वरण्याची
क्षमता राधा, सत्यभामा, रूक्मणी व सोळा हजार पट्टराण्यांमध्येही नाही.
देवाला वरण्यासाठी जो पवित्र गंध व श्रध्दा, सात्विक एकांत हवा तो तुळशीत
आहे. तुळशी विवाहाचा अर्थ विश्वव्यापी सत्तेला वृक्षातील चेतनेची करूण
हाक असा होतो. या विवाहामागचा गर्भितार्थ लक्षात घेतला पाहिजे. हा विवाह
पृथ्वीचे सुख-समृध्दी भरपूर पाऊस व चांगले पीक या सोबतच लोककल्याणाची आस
या गोष्टींचे प्रतीक आहे.

आषाढीला झोपलेले देव जेव्हा जागे होतात, त्यावेळी हरीवल्लभा तुळशी
त्यांची प्रार्थना ऐकते. तुळशी विवाह देव जागे होण्याच्या काळातील पवित्र
सोहळा मानला जातो. तुळशी विवाह संपूर्ण वैष्णवी चेतनेद्वारा पाहिलेले एक
महास्वप्न आहे, ज्यात देव स्वत: खाली उतरतात व या पृथ्वीतलावर अणूरेणूंना
तेजाने प्रकाशमय करतात. तुळशी विवाहाचा सरळ अर्थ तुळशीच्या माध्यमातून
देवांना आवाहन करणे असा होतो. तुळशीला केलेली प्रार्थना देवांपर्यंत
पोहोचते. यामुळे तुळशीला सामान्यांचा कल्पवृक्ष संबोधतात. आपल्यात
देवांपर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य नसते. तुळशी आपले दु:ख ऐकून ते
देवांपर्यंत पोहचवते, असे मानले जाते. म्हणूनच तुळशी व‍िवाह करविला जातो.

म्हणूनच या भूतलावर असलेले दु:ख-दारिद्र्य, रोग-राई, भय, द्वेष, नैसर्गिक
आपत्ती यापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्वजण मिळून तुळशीला साकडे घालू
या!

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top