मार्क ट्वेन एकदा आपल्या कार मधून घरी निघाले होते. रस्त्यात गटारीत एक कुत्र्याचे छोटू पिल्लू पडले होते. ते पिल्लू वर येण्याची धडपड करत होते, पण त्याला जमत नव्हते. कार पुढे गेली, मार्कने ड्राइव्हरला गाडी फिरवायला सांगितली. त्या गटारात हात घालून त्यांनी पिल्लाला बाहेर काढले, पिल्लू आनंदाने शेपटी हलवत निघून गेले.



हात रुमालाला पुसून मार्क गाडीत येऊन बसला. गाडी निघाली, ड्राइव्हरला चैन पडेना, त्याने विचारले.


-असे का केले तुम्ही, आय मीन अशी काय गरज होती.

-हे बघ, मी त्याला काढले नसते तर ते पिल्लू नक्की मरणार होते. आणि मुख्य म्हणजे मला रात्रभर झोप आली नसती.

-का झोप आली नसती?

-माझ्या आयुष्याचे काही सेकंद खर्च केल्याने एकाचा जीव वाचू शकला असता आणि मी स्वार्थी माणसासारखी ती काही सेकंद खर्च केली नाही ह्या विचाराने मला आयुष्यभर झोप आली नसती. जे आयुष्य मी देऊ शकत नाही, ते मी वाचवू नक्की शकतो... 💓

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top