गुरुजींनी वर्गामध्ये एक गंभीर विषय छेडला.   

 गुरूजी: (अतिउत्साहात) मुलांनो, सध्या ....

T 20 प्रकार खुपच फार्मात आहे. तुमच्या परीक्षा सुद्धा जर T20 सारख्या असल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल? कोणाला काही कल्पना?😇 

   पूर्ण वर्ग अचानक शांत झाला. कोणाला काहीच सुचेना.  

 ब-याच वेळानंतर बंड्याने हात वर केला. बंड्या एक व्रात्य आणि खोडकर मुलगा आहे हे पूर्ण वर्गाला माहीत होते.😉 

  


 गुरूजी (नकारात्मक स्वरूपात) : हा लवकर सांग काय सांगायचे ते.🙄 

  

 बंड्या गंभीर मुद्रा करून सांगु लागला. 

  

  "गुरूजी परीक्षा १ तास २० मिनटाची असली पाहीजे."😁 

  

 गुरूजी: "ठीक आहे, पुढे?" 

  

 बंड्या: "दर २० मिनटानंतर विद्यार्थ्यांना आपापसात बोलण्याकरता २ मिनटाचा time off असला पाहीजे."😍 

  

 गुरूजी टेंशन मध्ये: "बरं पुढे?" 

  

 बंड्या: "पहिले ३० मिनिटे Power-play असला पाहिजे, ज्यात शिक्षक वर्गाबाहेर असतील."😳 

  

 गुरूजींना हल्का हल्का घाम फूटू लागला. 

  

 बंड्या: "प्रश्नपत्रिकेतील एक प्रश्न फ्री हिट असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जे काही उत्तर लिहिले असेल त्याला पूर्ण मार्क मिळाले पाहिजेत."😊 

  

 गुरूजींचे कपडे घामाने ओले झाले. 

  

 बंड्या: "आणि कोणी पुरवणी घेतली की चिअर Girls नीं वर्गात येऊन २ मिनिट डांस केला पाहिजे."💃🏻💃🏻 

  

 पूर्ण वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विद्यार्थी बंड्या ला खांद्यावर घेऊन नाचू लागले.☝🏻☝🏻👏🏻👏🏻 

  

 गुरूजी कायमचे पावर प्ले मध्ये (वर्गाबाहेर) गेले. 😷😂😂

हसलात ना, हसायला हवंच होतं.. 😊असेच हसत रहा...

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top