आता तरी हो बोल..
तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल..
कसं सांगू तुला सजनी
तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल ! 


प्रेमात असं थांबायच नसतं,
मागे न वळता पुढेच चालायच असतं..
ऎकमेकांची साथ घेऊन
जग जिंकायचं असतं माझ्या मनात काय आहे,
ते तु अचुक ओळखतेस ..
ओळखूनी मग असे
तु मला पुन्हा पुन्हा तेच का विचारतेस ! 


तुझ्या डोळ्यात पाहता
मीच मला दिसते
तुझ्यात असलेली मी पाहुन
गालातल्या गालात हसतेकधी कधी अनोळखीच
जास्त जवळचे वाटतात
थोड्यासाठी असतो एकत्र
नंतर.. अनेक वाटा फुटताततो चंद्र आणि मी
आठवतं प्रिये तुला
दोघेपण कसे गोड हसतो
हे सांगत होतीस मला


तु समोर असल्यावर
आसपास कुणी नसाव
एकसारख तासन्तास
वाटतं पहात बसाव


त्या दिवशी निरोप घेताना
माझ्याकडे बघुन गालात हसलीस
पहिल्यांदाच काळजात धक होऊन
मनात माझ्या रुतुन बसलीस


मला कळतय ग तुझं
उदास आणि बैचेन मन
मी पण तुझ्याच आठवणीत
हरवुन जातो प्रत्येक क्षण


तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण
मनात आठवत राहिल
दिलासा देणारं तुझं बोलण
मनाला नेहमीच हसवत राहिल


तुझ्या मिठीतील गोडवा
नेहमीच मला भावतो
जसा थंडीच्या दिवसातील गारठा
क्षणार्धात निघुन जातो


सुख दुखाचा विचार करताना
मी तुलाच समोर पाहिले
माझे संपूर्ण जीवनच
तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले


माझ्यासमवेत जगताना
तू किती भावुक होतोस
सर्व काही मलाच देऊन
तू रिकामा कसा राहतोस


तुझ ते झुरने मला
त्यावेळेसच जाणवले होते
जेव्हा त्या शांत कातरवेळी
तुझे डोळे पानावले होते


माझ्या हसण्याला तू पण
खळखळुन दिलीस दाद
त्या शीतल चंद्राच्या छायेत पण
मज वाटली घालावी तुला साद


हे सांगू की ते सांगू करत
तेच तर सांगायाच राहीले
तिचे ते मुके शब्द मी
माझ्या मुकया डोळ्यांनीच पाहिलेतुझा तो पहिला स्पर्श
आजही मला आठवितो
ते दुर्मिळ रोमांचीत क्षण
आजही मनात साठवितो


तू अशी लाजलिस की
मलाही काही सूचत नाही
तुज़े मुरकने पहिल्याशिवाय
मला चैन पडत नाहीPost a Comment Blogger

 
Top