मिठीत तुझ्या अडकले क्षण…
मिठीत तुझ्या
अडकले क्षण,
खेळताना कुंतलांशी
केसांत तुझ्या गुंतले क्षण.
चुंबीले तुला मी
ओल्या ओठांवर विरघळले क्षण,
लाजलीस अशी खुब तु
गालावर गुलाबी खुलले क्षण.
लकीर पाठीवर ओढिले मी
शहा-यात तुझ्या थरारले क्षण,
बंद डोळ्यांच्या त्या
नजरेत तुझ्या विखुरले क्षण.
अलगद मिठीत आलो मी
धुंद श्वासात तुझ्या मोहरले क्षण,
आयुष्यभर जपावे मी,
असे
मिठीत तुझ्या अडकले क्षण…
Post a Comment Blogger

 
Top