मोकळ्या हवेचा श्वास दे,
मला पुन्हा एकदा जगण्याचा भास दे.
आज चांदण्याही विजलेत बघ,
त्यान्हाही चमकण्याचा ध्यास दे

तुझ्या नाजुकपणावर लिहायचं म्हणजे,
मला खुपच अवघड वाटतं.
कविता-चारोळ्या तर लांबच,
'नाजुक' शब्द सुद्दा जरा जड वाटतं

कोमल तुझ्या चेहर-या वरुन
अश्रु का ओघळावे
गालात फ़क्त खळीने फ़ुलायचे
हे डोळ्यांनाही न समजावे?

दिवसागन श्वास नविन
श्वासा मागुन भास नविन
पण तुझ होकारानेच सुरु होइल
माझ्या आयुष्याचा प्रवास नविन !!!

आधीच नाक तुझं एवढे एवढे,
त्यावर रागाचे ऒझे केवढे.
नजर तर अशी करारी,
कि काळजाला नुसते जखमांचे धडे

थंडीचं एकदा
प्रेम जडलं पहाटेवर,
आजही ते एकत्र चालताना दिसतात
सकाळच्या वाटेवर.

माझ्या ओठावरचं हसु,
आहे साक्ष तु आठवल्याचं.
आठवणी तुझ्या आठवुन,
क्षणभर जगाला विसरल्याचं

माझ्या ओंजळीतुन तुझ्या आठवणींची
नेहमी पिसं मी उडवावी…
अलगद अशी उडुन ती,
पुन्हा माझ्याच पदरत पडावी…

माझ्या कविता-चारोळ्या म्हणजे,
माझ्या भावना, माझे अनुभव.
माझ्या मनाच्या पात्यावर साठलेले,
माझ्याच आठवणींचे दव

आठवणींचा हा गुच्छ,
कोप-यात मनाच्या साठवण्यासाठी.
सोंग करुन विसरल्याचं,
पुन्हा एकदा आठवण्यासाठी.

आठवणींतल्या आठवणींना
हळुच आठवायचं असतं.
डोळे पान्हावलेले असले तरी
मंद गालातल्या गालात हसायचं असतं

सगळंच बरोबर करताना
काही चुका करुन गेलो,
त्यात न विसरना-या व्यक्तीलाही
मी आज विसरुन गेलो,

संध्याकाळची वेळ
सुर्य दमुन अस्ताकडे झुकलेला,
नि:शब्द सांगुन जातो
'उगवणार आहे मी पुन्हा एकदा मावळायला'

एकांताला सोबत घेऊन
समुद्र किना-यावरुन चालताना,
वाळुनेही जागा सोडावी पायाखालुन ?
लाट माझ्यापासुन ओसरताना…!!!

प्रत्येकामध्ये एक
'मी माझा' लपलेला असतो…
कधी कधी शोधावं लागत 
तर कधी दाखवला जातो

पिकलेल्या पानाला
वा-याची तमा नसते.
म्हणुनच कदाचीत
ते जास्त सळसळते.

कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु, सोज्वळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली

असे कितीतरी बंध
जुळले असतील तुझ्या आयुष्यात…
एक बंध माझ्याही मैत्रीचे
जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात…

पानांवर साठलेल्या थेंबासारखे
रंग मैत्रीचे,
रोजरोज भांडुण घट्ट होणारे
हे बंध मैत्रीचे

फुल कधी म्हणत नाही
की सुगंध नेहमी वा-यावरच फिरतो,
कारण, त्यालाही माहीत असतं
कितीही दुर गेला तरी तो फुलाचाच असतो

खुणवीत आहे काही
तिळ तुझ्या गालावरचे,
मलाच समजत नाही
ते शब्दात कसे सांगायचे

तुझ्या आठवणींचा एक थेंब
नेहमी माझ्या डोळ्यांच्या कोप-यात असतो,
पानांवर दव चमकावे
तसे नजरेत माझ्या चमकतो.

तुझा 'अनोळखी'पणा ही
आता ओळखीचा वाटायला लागला आहे.
अनोळखी 'तु' असलीस तरीही
तो माझ्या ओळखीचा झाला आहे

हिरवळीवर धावणारी पायवाट,
किती अस्मितेने वागते.
हिरवळ ओसरली की,
निपचीत पडुन पुन्हा वाट पाहते.

प्रेम म्हणजे काय…
हवा असलेला तिचा नि:शब्द सहवास,
नी, तिनं माळलेल्या गज-याचा
मी ऊर भरुन घेतलेला श्वास

आपली पहीली भेट.. नवी ओळख..
एक सुगंध मनात ठेऊन गेली.
तसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण,
तरी एक बंध मनात ठेऊन गेली.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top