आधीच सांगतो माझ्या बऱ्याच प्रेमकहाण्या झाल्या असल्या तरी माझं ठरवूनच लग्न झाल आहे. माझ्या प्रेमकहाण्यांची सुरुवात चवथी पासून झाली म्हणजे माझ्या बऱ्याच प्रेमकहाण्या एकतर्फी झाल्या आहेत पण मी आपला हेका म्हणून काही सोडला नाही आहे पण आता लग्न झाल्या मुळे बऱ्याच गोष्टीवर बंधन आली आहेत असो तर माझ पहीलं प्रेम हे चवथीमध्ये झालं
एक गवळी नावाची मुलगी होती छान दिसायची पांढरा शुभ्र फ्रॉक घालून यायची खूप हुशार होती त्यामुळे कदाचित वास द्यायची नाही ह्यांमुळेच कदाचित पुढे काही जाऊ शकले नाही मग आमच्या शाळेत मुलं मुली एकत्र बसण्याची पद्धत निघाली तेव्हा एक छान सुंदर मुलगी माझ्या शेजारी बसायला आली पण थोड्या दिवसात पुन्हा मुलं मुली वेगळे बसायला लागली आणि आमची ही प्रेमकहाणी देखील पूर्ण होऊ शकली नाही.नंतर मला पाचवी मध्ये पुन्हा प्रेम झालं ह्या वेळी एक मुलगी होती खूप हुशार आणि डांस मध्ये पण खूप पारंगत होती ती मराठी होती पण सगळे तिला ज्युली म्हणायचे तिच्या साठी मी एकदा सरांचा मार पण खाल्ला होता कारण ते शिकवत असताना मी तिच्या कडे बघत बसलो होतो असो.हे सगळं पाचवीत बरका, मग हे लहान पण संपल आणि मी थोडा मोठा झालो म्हणजे सातवीत गेलो त्या काळी QSQT लागला होता आणि प्रेमकैदी पण लागला होता मग माझा एक मित्र १०वित होता त्याच्या बहिणी वर मी प्रेम करायला लागलो त्या काळी आमच्यावर वरील चित्रपटांचा खूप इंफ्लुअन्स होता मी अंघोळी ला जाताना ति तिच्या बाल्कनीत यायची अशी ती मला आवडायला लागली. अलीकडेच समजलं तिचा डिवोर्स झालाय आणि तिला कसलीतरी ट्रीटमेंट चालू आहे असो बिचारी किती छान दिसायची अजूनही तिची ती बाल्कनीतली छबी मनातून जात नाही. मित्राच्या धाका मुळे पुढे काही होऊ शकले नाही असो
मग आम्ही थोडे अजून मोठे झालो म्हणजे आठवींत आलो मग आमच्या समोरच्या घरात साळुंखे म्हणून एक जण राहायला होते इकडे आमचं पहिलं खरं प्रेम जमलं ती मुलगी रोज तिच्या खिडकीत यायची आणि आम्ही दोघे एकमेकां कडे तासन तास पाहत बसायचो नंतर आमचं भांडण झाल आणि ही प्रेम कहाणी तिथेच संपली कारण ती अजून एक दोघांशी प्रेमालाप करत होती असो.
मग आम्हाला आणखी एक मुलगी सापडली ति आमच्या समोरच्या घरात राहायला आली होती. तिचं नाव खूप छान होत मौसमी गल्लीतली सगळी मुलं तिच्यावर मरायची ती हुशार होती माझा एक मित्र तिच्या बहिणी वर लाइन मारायचा मग एकदा तिने आम्हाला बोलवून खूप झापला होता मग नंतर मला तिच्या पाठी मागे लागायची हिंमतच झाली नाही असो
मग मला वरची मुलगी होती ना जिश्याची माझं भांडण झाल होत तिच्या बहिणीशी प्रेम जमल ते थोडं पुढे जाणार तेवढ्यात आमचं घरच शिफ्ट झाल आणि माझा हे प्रेम पण अधुरं राहिलं असो

मी आता नवीन घरी आलो पण मला शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागलं आता मी बारावीत गेलो होतो एका लहानश्या गावांतून एका मोठ्या शहरात आलो इथे मला मायेची माणसं कमी आणि व्यवहारी माणसं जास्त भेटली इकडे मात्र मला उथळ प्रेमा पेक्षा संवेदनशील प्रेम काय असत ते समजलं आणि प्रेम ह्या विषयात माझा अनुभव मोठा झाला.
मी थर्ड इयरला असताना माझा एक मित्र एका मुलीवर लाइन मारायचा म्हणजे तसा त्याचा तिच्या मधला इंटरेस्ट फक्त मजा करण्यापुरताच होता त्याला वाटायचं आपल्या ह्या मित्राच पण सुत तिच्या बहिणीशी जमवून द्यावं किती चांगला होता माझा मित्र मी पण लगेच म्हणालो चालेल आम्ही भेटायची वेळ ठरवली बरोबर त्या वेळेस माझा मित्र त्या मुलीस घेऊन आला मी खाली मान घालून उभा होतो तसा मी लाजाळू आहे थोड्या वेळाने मी माझी मान वर नेली मी उडालोच ती मुलगी खूपच लहान होती ती मुलगी नववीत होती आणि ती सुद्धा तयार झाली होती कारण मी तसा बरा दिसायचो गोरा आणि घारा तिला बघितल्यावर मी गारच झालो एक नववीतली मुलगी माझ्यावर प्रेम करायला तयार होती इकडे माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आला मला तेव्हा खरं मुलींचं मन समजायला लागलं त्या निरागस असतात ही खूप जुनी गोष्ट आहे आज कालच्या मुली खूप उथळ असतात त्यांना सहवास हवा असतो तशा आजही काही मुली असतील म्हणा पण त्यांची संख्या नक्कीच कमी आहे मी माझ्या मित्राला जायला सांगितलं तिला म्हणालो तू खुपा लहान आहेस गं तू आता स्टडीज कंप्लीट कर तू इंजिनिअर्रिंग कंप्लीट केलेस की मीच तुझ्याकडे येईन ती काय समजायचा ते समजली मी काही पुन्हा तिच्याकडे गेलो नाही
त्याच्या पुढे मला आमचा इलेक्ट्रॉनिक्सच्या मॅडम शी प्रेम जाल त्यांचे डोळे माझ्या सारखेच घारे होते त्यांचा क्लास मी कधीच चुकवायचो नाही त्यांच्या प्रेमात इतरही खूप मुले पडली होती एकदा आमच्या एका मित्र पैकी एक जण त्यांना म्हणाला होता की तुम्ही काजोल सारख्या दिसता तो मुलगा नंतर मॅडमच्या जवळ पासही नंतर दिसला नव्हता असो ह्या प्रकारा मुळे माझं ते प्रेम शोलेतल्या बच्चन सारखं अधुरं राहील होत.
माझं पुढचं प्रेम हे थोड्या परिपक्व वयात झालं जेव्हा मला माझा पहिला जॉब लागला ती खूप छान मुलगी होती शिल्पा तिचं नाव. एक वर्ष ती बिचारी माझ्या मागे लागली होती. मला तिच्या फिलिंगच समजल्या नाहीत पण खरं प्रेम असल्या मुळे ते जे म्हणतात ना दिल में कुछ कुछ होता है तसं व्हायचं तीच्या बद्दल खूप प्रोटेक्टीव झालो होतो मेहदी हसन च्या गझल ऐकू लागलो होतो मी खूप इन्सिक्युअर होतो म्हणून पण असेल कदाचित तिच्याशी बोलताना खूप घाबरायचो ती पण आधी मला प्रतिसाद द्यायची पण नंतर काय बिनसलं माहीत नाही ती माझ्या एका मित्रा बरोबर फिरू लागली पण अजूनही ती मला आठवते तिला त्या मित्राने देखील सोडलं आज तिच लग्न झालं आहे तिला एक मुलगी पण आहे

टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top