कुठे गेले ते मंतरलेले दिवस अन् धुंद रात्री
ती हुरहुर, ती जवळीक, ती लुटुपुटुची मैत्री
त्या हळव्या गोष्टी फक्त फक्त त्यालाच सांगण
त्याच्या तिच्या स्वप्नांत दिवस दिवस रमण

प्रेमात असं का होतं ?

ते आकर्षण कुठं विरतं ?

खूप भूक लागली असून अर्धा अर्धा वडापाव खाण

महिनों महिने लक्षात ठेवून त्याला आवडलेलं घड्याळ देण
त्याच्या क्रिकेटच्या वायफळ गप्पा तास न् तास ऐकून घेण
त्याला चिडून मनवून हट्टाने शौपिंगला घेउन जाण

प्रेमात असं का होतं ?

ते आकर्षण कुठं विरतं ?


त्याच्या नावाची हाक मारली तरी दचकेनाशी होते
त्याच्यावरून चिडवलं तरी, आता ती लाजेनाशी होते
फोनची वाट बघत नाही, वर स्वतःचा एंगेज असतो
त्याला! reply करायला तिच्याकडे balance नसतो

प्रेमात असं का होतं ?
ते आकर्षण कुठं विरतं ?

 

 

तो पिक्चरला बोलावतो तेव्हां मैत्रिणीशी गाठभेट असते
अचानक घरी जायचं असतं अन त्याची बस लेट असते
मुद्दाम त्याच्या ऑफिस वरून ऑटोही न्यायची नसते
तो काल काय करत होता याची नोंदही घ्यायची नसते

प्रेमात असं का होतं ?
ते आकर्षण कुठं विरतं ?


एकाएकी जाणीव होते की त्याच्याशिवायही जगू शकते
त्याच्याशिवाय भर चांदण्यात गाढ झोप येऊ लागते
त्याच्या आठवणीने येणारा शहारा उमटेनासा होतो
आता ती त्याची मिठी नसते, तो फक्त वाराच असतो

 


प्रेमात असं का होतं ?
ते आकर्षण कुठं विरतं ?






टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top