२ . जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब
९ यशाच्या मार्गावर नेहमीच 'अंडर कन्स्ट्रक्शन'ची पाटी लटकत असते.
१० मी १३ वर्षांचा होईपर्यंत माझे नाव 'गप्प बस गधड्या' हेच आहे, अशी माझी खात्री होती.
११ सदैव' आणि 'कधीच नाही' हे शब्द कधीच वापरू नयेत हे सदैव लक्षात ठेवा.
१२ कोणत्याही प्रिंटरला प्रमुख तीन भाग असतात, पेपर जॅम झालेला ट्रे, त्याची सूचना देणारा स्क्रीन आणि सतत उघडझाप करणारा लाल दिवा!!!
१३ पहिले चाक ज्याने शोधून काढले, त्याचे एवढे कौतुक कशाला? इतर तीन ज्यांनी शोधली, ते खरे कौतुकाला पात्र आहेत!!!!
१४ वक्तशीर असण्याचा मोठा तोटा म्हणजे या गुणाचं कौतुक करायला कुणीच हजर नसतं!
१५ माणसांचीही गंमत असते पाहा. तुम्ही एखाद्या माणसाला सांगा, आकाशगंगेत ३०० अब्ज तारे आहेत... तो चटकन विश्वास ठेवतो. पण, पार्कातल्या बेंचला नुकताच रंग लावलाय, तो ओला आहे असं सांगा... तो स्वत: हात लावून बोटं बरबटवून खात्री करून घेतल्याशिवाय राहात नाही!!!!
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.