कधीतरी वाटतं यार……

ह्या खांद्यावर डोकं ठेवून,
तिला रडावसं वाटावं,
काँलेजनंतर मागे थांबून,
सोबत बसावसं वाटावं,

ज्या स्वप्नांमधे माझ्या,
सगळ्या रात्री जागतात,
त्या स्वप्नांमधे हरवून,
तिलाही जागावसं वाटावं,

माझे आसू पुसून तिनं,
आमच्या सुखात हसावं,
कधीतरी वाटतं यार,
आपलंही कुणीतरी असावं,

छोट्या छोट्या गोष्टींमधे,
खोटं खोटं चिडावं,
पण, भेटीनंतर निघते म्हणताना,
तिचं पाऊल अडावं,

बाकी सगळ्या जगाचा,
पडेलच विसर तेव्हा,
तिनं माझ्या प्रेमात,
अगदी आकंठ बुडावं,

ह्या छोट्याश्या स्वप्नानं,
एकदाच खरं व्हावं,
नेहमीच वाटतं यार,
आपलंही कुणी असावं!!!!!

Post a Comment Blogger

 
Top