काही कळतच नाही मला
नक्की कुणाचे चुकतंय काय?
असे तर दुःखी होतोय दोघेही आपण
ह्यावर नक्की उपाय काय?
नाही ग माझ्या मनात
तुला वाटते तसे काहीही नसते
न भांडण्यासाठी मनाची
पुर्ण तयारीही असते
पण नेमके त्याच दिवशी
असे काही अचानक घडते
आणी मग तुझ्यामाझ्यात
नेहमीच कश्यावरुन बिनसते

मान्य आहे की
आहे मी गरम डोक्याचा
पण तु तरी मला समजुन घे
अग त्रास होतो मला ही सगळ्याचा
माझी बाजुजी शांतपणे ऐकुन घे
मी माझे नेहमीचे रडगाणे वाजवतो
आणी मग तु माझ्यावर चिडतेस
आणी मग मागचा पुढचा
विचार न करता
वर माझ्यावरच वैतागतेस

तुला फोन करायला जावे तर
तुझा मोबाईल स्विच ऑफ करतेस
सांग ना मला एकदा
तु मला असे का सतावतेस
भांडतेस माझ्याशी अन
मग स्वतःसुध्दा रडतेस
माहीतीय नाही चिडणार तुझ्यावर
तरीही माझी काळजी करतेस

राग शांत झाला की
स्वतः फोन करतेस
लाडी-गोडीने हाका मारुन
वर मस्काही लावतेस
माहीतीय मला की
तु माझ्यावर खुप प्रेम करतेस
म्हणुनच का कदाचीत
नेहमीच तु माझ्याशी भांडतेस

Post a Comment Blogger

 
Top