सुख म्हणे शोधायच नसत ते आपोआपच मिळत
खरच अस असत का?
मग ह्या जगात कुणीच दुक्खी नसत नाही का?
सुख हे मानन्यावर असत अस मला वाटत

कुणाला पावसात अखंड भिजुन सुख मिळत
तर कुणाला नुसताच पाउस बघून सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......

कुणाला प्राजक्ताच्या सुवासात सुख मिळत
तर कुणाला तीच फूल तोडून सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......

कुणाला मित्रांमध्ये रमण्यात सुख मिळत
तर कुणाला एकटाच रहाण्यात सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......

कुणाला प्रियकराची वाट बघण्यात सुख मिळत
तर कुणाला प्रियकराला वाट बघायला लावण्यात सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......

कुणाला प्रेम देण्यात सुख मिळत
तर कुणाला प्रेम घेण्यात सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......

कुणाला ही कविता लिहिण्यात सुख मिळत
तर कुणाला ही कविता वाचण्यात सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......

कुणाला देव देव करण्यात सुख मिळत
तर कुणाला फक्त मनापासून नमस्कार करण्यात सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......

कुणाला हसता हसता आयुष्याशी दोन हात करण्यात सुख मिळत
तर कुणाला रोज़ रोज़ रडून रडून जगण्यात सुख मिळत

Post a Comment Blogger

 
Top