गांधीजी आणि सावरकर - एक झणझणीत अंजन
गांधीजी - भारतवासीयांनो शत्रूवर प्रेम करा व त्याच्यावर विश्वास ठेवा.
सावरकर - शत्रूवर प्रेम अथवा विश्वास ठेवला जात नाही.
गांधीजी - अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा.
सावरकर - स्वरक्षण करणे म्हणजे हिंसा नव्हे. मूर्ख हिंदूंनो, एक गळा कापला तर कापायला दुसरा गळाच उरत नाही.
गांधीजी - मी पण एक हिंदू आहे व हिंदूंचे सर्व देव शांतीचा संदेश देतात.
सावरकर - तुम्ही पोकळ हिंदू आहात. रामाच्या हातात धनुष्यबाण व कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र आहे. सज्जनांच्या रक्षणासाठी देवांनाही हाती शस्त्र घ्यावे
लागते.
गांधीजी - हाती शस्त्र घेणे कधीही वाईट होय. शत्रूशी लढायचे असेल तर त्याच्या तत्त्वांशी लढा.
सावरकर - युद्धात तत्त्व नव्हे तर तलवारी टिकतात व जिंकतात. राष्ट्राच्या सीमा या फक्त तलवारीनेच आखता येतात, तत्त्वांनी नव्हे.
गांधीजी - हृदयपरिवर्तनावर विश्वास ठेवा. शत्रूचे मन जिंका.
सावरकर - ज्याने आपल्याला मारून टाकायचे ठरवले आहे त्याचे मन जिंकता येत नाही. हे हिंदूंनो, अफझलखानाचे हृदय परिवर्तन करता येत नाही,
त्याचे ह्यदय फोडावे लागते.

Post a Comment Blogger

 
Top