भरपूर मित्र – मैत्रिणी असतील तुला
पण त्यात मी खास आहे का??
हे विचारायचय तुला….सर्वांशी खुप काही share करत असशील
पण त्यात काही खास
माझ्याशी share करतोस का??
हे विचारायचय तुला…

सर्वाना तू असाच सतावतोस
की फ़क्त मला सतावतोस???
हे विचारायचय तुला…

तुझ्या सर्व मित्र-मैत्रिणी च्या
रांगेत मी कुठवर आली आहे???
हे विचारायचय तुला…

तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगते
पण ती समजते का ??
हे विचारायचय तुला…

हे करताना मला सवय झालिये तुझी
पण तुला माझी सवय झाली आहे का???
हे विचारायचय तुला….

तुझ्या आयुष्यातील सुख- दू:खात
मी किती भागीदार आहे..आहे की नाही??
हे विचारायचय तुला…

इतक सार विचारल्यानंतर
आणखी एक विचारावस वाटतय..
"मी तुला सोडून गेले तर..कस वाटेल????"
खर तर हेच विचारायचय तुला…..

Plzzzzzz give me a replyyyyyyyyy????????


 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top