तू प्रेमात पडला आणि माझ प्रेम
बघायला विसरून गेला

तुझी प्रत्येक बडबड ऐकतेय पण मला
जे ऐकायचय ते सांगायला विसरून गेला

मी हो म्हणील कि नाही याचा
तू स्वतःच विचार करून गेलास

फुलणाऱ्या माझ्या प्रेमावर
अशुभ विचार तू करून गेलास
नुसतच बघितलं डोळ्यांमध्ये
प्रेम बघायचं विसरून गेलास

सागायचं बरच काही होत तुला
सागायचं तू विसरून गेलास
विचारणार मी हि होते
पण अडवायचं तू विसरून गेलास  
साभार - कवियेत्री: प्रिया उमप

Post a Comment Blogger

 
Top