निसर्गाचा भाग होते मी
पानांना माझ्या हवा हलवायची ती
पक्षी तर माझे मित्रच होते
प्रत्येक गोष्ट सागायचे
घरट करून माझ्या कुशीत राहायचे
मानवावर माझे अनेक उपकार होते
आणखी काही उपकार मी
करणार होते
हवे सोबत झुलणार होते
पक्ष्याचे बोलणे ऐकणार होते
पाण्याला मी अडवणार होते
पक्ष्याचे घरटे बांधणार होते
पण आता मी निर्जीव झाले होते
मानवाने मला माझ्या जागेवरून
पाडले होते
मोडले होते
जगण्याचे अधिकार हिसकावले होते
मी वृक्ष राहिले नव्हते........
साभार - कवियेत्री : प्रिया उमप
Post a Comment Blogger Facebook