दूर कुठे तरी हरवल्यासारखी बघते,
हळूच गालातल्या गालात हसते,
नकळतच स्वता:तच गुंतते,
अन त्याचाच विचार करत क्षितिजापार पाहते,
तो नसतानाही त्याच्याबरोबर बोलते,
अन तो समोर नसतानाही त्यालाच ही पाहते,
कुनाशिही बोलताना ह्याचाच विषय असतो,
रात्रंदिन हिच्या स्वप्नात तोच एक राहतो,
ती स्वतःचा नाही त्याचाच विचार करते,
देवाकडे स्वतःच नाही त्याच सुख मागते,
तो समोर असला की त्याच्याशी बोलताच नाही,
सांगा बर, ही न बोलन्याच सोंग घेते की नाही?
आवडतो का तो विचारल्यावर लाडिक हसते,
माहित नाही म्हणुन विषय बदल म्हणते,
गालावरची लाजेची रक्तिमा लपवशील कशी?
त्याच्यावरती प्रेम आहे हे त्याला सांगशील कधी?
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
Post a Comment Blogger Facebook