सारख सारख मरण्यात काय आहे अर्थ,
प्रेमासाठी का घालवायच जीवन व्यर्थ.

जीवन आहे म्हणून प्रेम आहे, प्रेमासाठी जीवन नाही,
प्रेमासाठी सगळे का करतात अती घाई.

प्रेमा पाई सगळे वाट्टेल ते करतात,
स्वतःच मांडलेल्या खेळात आपणच हरतात.

प्रेम झाल कि कुणाला चांगली वाट लागते,
आणि प्रेम तुटल्यावर त्याची चांगलीच वाट लागते.

प्रेमाची ती कठीण वाट सगळेच चढत असतात,
वाट चुकल्यावर मात्र सारखे रडत बसतात.

प्रेम इतक कठीण असत मग का त्यात पडावे,
आधी आनंदाने मग का आठवत रडावे.

कितीही आठवण आली तुला, तरी नको सोडूस धीर.
ते हि नाही जमल तर माझ्या कवितेकडे फिर.

तीच देईल बघ तुला जगण्याची नवीन आशा,
तुझ्यासाठीच तर केली आहे कवितेची अशी भाषा.

साभार - कवी: विशाल गावडे.

Post a Comment Blogger

 
Top