तुझेही पाय मातिचेच असतिल
याची जाणिव आधिच होती
म्हणुनच तुला वाहिलेली प्रत्येक ओंजळ
सुंदर फुलांची पण कागदिच होती !

तुझे काय ते तुला माहित
प्रेम माझे खरे होते
तुला ओळखता नाही आले
मी तर सर्वस्व तुला वाहिले होते

 मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.कळलच नाही कधी मला
तुझ ते आतल्या आत जळण
जवळ असून ही लक्ष्यातच आल नाही
तुझ एकटीचच तरफडण

जवळ असून ही लक्ष्यातच आल नाही
कारण तुझी कळी कधी खुललीच नाही
मिट्लेल्या ओठामागची
निःशब्द भाषा कळलीच नाही


ओठ जरी माझे मिटलेले
डोळे मात्र उघडे होते
तू ओठातून फूटणार्‍या शब्दाची वाट पहिली
पण डोळ्यानी ते कधीच वेक्त केले होते...

डोळ्यांनी व्यक्त केलेस
ते डोळ्यानिच ऎकले
पापण्या मिटता मिटता
आसवांनीच टिपलेआसवांची फुलेच दिलीस मला तु
मौन राखिले तरी
का डोळ्यात तुज्या सदा प्रश्नभाव
राजसा प्रीत माजी हि खरी

खरी जरी असेल प्रित तुझी...
का केली नाही तु व्यक्त...
सदा वात बघण्यात तुझी...
आटले माझ्या देहाचे रक्त...

अव्यक्ताला व्यक्त होण्याची
वाट मीही पाहिली
तू या वाटेवर वळण्या आधिच
मग ही वाट का ग संपली


मी तर तेथेच होते वाट बघत....
तुझिच नजर ना वळली....
प्रित मझ्या मनाची सदा...
तुलाच ति का न कळली???

वाट होती अजून शिल्लक
प्रवासच संपला
ज्याचा त्याचा वाटा जितका
त्याचा त्याला मिळाला.

सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षला
दिवसाची खुप आश्वासन
देऊन रात्री मात्र फितूर झालारात्रीची जागी राहून
मी त्या चांदनिला बघत होती
ती सुद्धा माझ्याप्रमाणे
एकटीच हसत होती........

नाही म्हणाले नसले तरी
हो सुद्धा बोलले नाहीतो
विचारून थांबला तरी
मला काही सुचले नाही ....

प्रेम करायचाच म्हटल तर
कुनाशिही जमत नाही
मनासारख्या जोड़ी दाराशिवाय
संसारात मन रमत नाही

कदाचित म्हणताना माणूस
नशिबावर अवलंबून असतो
हजारदा त्याच्याकडून फसुन
हि त्याच्यावरच विश्वास ठेवतो

ओळखिच्या माणसाने
ओळखल्या सारखं वागायचं
कारण शोधून बोलन्यापेक्षा
कारनाशिवाय बोलायचं....

दिवेलागण वणव्यासारखी पसरते
रात्र झाल्यावर
पण आपलं घर मात्र उजळतं
तू दाराशी आल्यावर

रात्रं पटकन सरते
तुला उराशी धरून
मग दिवसभर तुला पहात राहते
मी परक्यासारखं दुरून

आभाळ बरसताना
सरळ दार लावून घ्यावं
नाहीतर स्वत:ला
दिशाहीन जाऊ द्यावं

पाऊस म्हणजे खरं सांगतो
परीक्षा असते स्वत:ची
किती गोष्टींची कबुली
आपण देत राहतो स्वत:शी

कुठून तरी येउन
पाऊस ईथला होउन जातो
आणि माझ्यासोबत मी बनुन
तो हलवा होउन पहातो

वेड्या क्षणी भास् होतो
तू जवळ असल्याचा
डोळे उगीच दावा करतात
तू स्पष्ट दिसल्याचा

पाऊस एकदाचा पडून जातो
पावसाचे दिवस असले की
आसवांचं तसं नसतं, ते पुन्हा येतात
एकदा डोळे पुसले की

पावसावरच्या निबंधाला
कधीच पूर्ण मार्क मिळत नाहीत
कारण मार्क देणारा आणि घेणारा
दोघांनाही तो कळत नाही

श्रवण म्हणजे मला वाटतं
प्राजक्ताचे दिवस
स्रुष्टिने कधीतरी करून
फेडलेला नवस

शब्द हा शेवटचा उपाय आहे
प्रश्नांचं उत्तर मिळायला
नाहीतर एक कटाक्ष पुरतो
मनातलं गुज कळायला

मनाची तहान
पाण्यानं भागत नाही
हे बरं आहे की सगळ्यानाच
मनाची तहान लागत नाही

मला एक सुखी माणूस
त्याची दु:ख सांगत बसला
आणि माझा दाटून आलेला अश्रु
मी निमुटपणे पुसला

त्याच्याकडे काय मागायचं
हेच आपल्याला कळत नाही
म्हणुन बाकी सगळ मिळत राहतं
नेमकं जे हवं त्या कधी मिळत नाही

पुढे अथांग पसरलेला सागर
मागे पसरलेला माझा गाव
मधे मी ठिपक्या एवढा
तरी मला माझं असं नाव

पहाटेआधी जाग येणं
किती त्रासदायक असतं
सोसून झालेलं आयुष्य
उघड्या डोळ्याना दिसतं

एक निरंतर प्रवास सुरु होतो
माझ्याकडून माझ्याकडे
आणि तुला वाटतं मी निघालो
पाठ फिरवून तुझ्याकडे

तू क्षितिजासारखा......
जवळ यायला लागलं की लांब राहतोस
आणि यायचं थांबलं की
आशेने पाहतोस

Post a Comment Blogger

 
Top