कावळा - चिऊताई चिऊताई दार उघड...
चिमणी - थांब बाळाला आंघोळ घालू दे.
कावळा - चिऊताई चिऊताई दार उघड...
चिमणी - थांब बाळाला काजळ लावू दे.
कावळा - चिऊताई चिऊताई दार उघड...
चिमणी - थांब बाळाला तेल लावू दे.
कावळा - बाळ गेलं तेल लावत् आधी दार उघड!!!!!!!!!
-------------------------------------------------------------
एक युरोपियन माणूस एका भारतीय शेतकर्याजवळ शेतात बसलेला असतो.
त्यावेळी तेथून साप जात असतो.
ते पाहून युरोपियन माणूस विचारतो. व्हॉट इज धिस?
भारतीय : धिस ईज अ बाऊ, हात नका लाऊ..
-------------------------------------------------------------
एक स्त्री तिच्या नवऱ्याला म्हणते..." अहो ही जेनी कोण आहे हो ?'
नवरा ..(थोडासा घाबरत )..." अगं जेनी हे एका कुत्र्याच्या पिल्लूचे नाव आहे....आपण लवकरच ते विकत घेणार आहोत..."
बायको..." असं होय...अहो त्या कुत्रीचा सकाळपासून ५ वेळा फोन येऊन गेला तुमच्यासाठी "..
-------------------------------------------------------------
प्रश्न-जर kites मराठीत आला असता तर बार्बरा मोरीने त्यात कुठले गाणे म्हटले असते?
उत्तर-चढाओढीनं चढवीत होते
चढाओढीनं चढवीत होते
...
ग बाई मी पतंग उडवीत होते
ग बाई मी पतंग उडवीत होते
-------------------------------------------------------------
बायको आणि सूर्य यात साम्य काय?
करा विचार...
.....
.....
.....
नाही जमत, अहो सोप्पंय...
दोघांकडेही डोळे वर करून बघता येत नाही.
-------------------------------------------------------------
मुलगी एका मुलाला प्रेमाने विचारते,तू माझा होशील का?
मुलगा: नाही.मुलगी : का??
मुलगा: कारण मी माझा झालो तर, तू मला पिऊन टाकशील...
-------------------------------------------------------------
राजू आपल्य वडिलांना म्हणत होता, "पप्पा, केशवसुत कोण होते हे?"
"केशवसुत? एवढंही ठाऊक नाही तुला? इतिहासाच पुस्तक आण तुझं, आता सांगतो" वडील म्हणाले.
-------------------------------------------------------------
दिर्घ अजाराने त्रासलेले अण्णा डॉ. कर्वेकडे जातात.
डॉ. कर्वे : तुमचे फ़ॅमिली डॉक्टर कोणते?
अण्णा : डॉ. देशपांडे.
डॉ. कर्वे : अहो, ते डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतात.तुम्हाला कोणता दिला?
अण्णा : तुमच्याकडे जाण्याचा..........
-------------------------------------------------------------
हवालदार जेलरला : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते.
जेलर : व्वा ! छान सुधारताहेत तर आपले कैदी.
हवालदार : नाही साहेब.
जेलर : नाही ? काय झाले.
हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही.
-------------------------------------------------------------
पाण्याचा पोपट कसा करायचा ?
पाणी तापवायचं आणि आंघोळच करायची नाही
बादलीचा पोपट कसा करायचा?
नळाखाली बादली ठेवायची आणि नळच सुरु करायचा नाही
नळाचा बादलीचा आणि पाण्याचा पोपट कसा करायचा?
नळच सुरु करायचा आणि बादलीच काढुन घ्यायची
-------------------------------------------------------------
एकदा एका सरदारजीचं गाढव हरवलं. दिवसभर त्याने सगळं गाव गाढव शोधण्यासाठी पालथं घातलं पण त्याला काही त्याचं गाढव सापडलं नाही. संध्याकाळी थकून घरी आल्यावर त्याने देवाचे धन्यावाद देवून त्याचे आभार मानले. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला आश्चर्याने विचारले, '' इकडे आपलं गाढव हरवलं आणि तुम्ही देवाचे आभार का मानता आहात''
'' कारण,... ते तरी बरं झालं जेव्हा हरवलं तेव्हा ते गाढव एकटं होतं... त्याच्या पाठीवर मी बसलेलो असतो तर!''
-------------------------------------------------------------
प्रश्न - सरदारजीला कन्फ्यूज कसे कराल?
उत्तर - ....
....
उत्तर - सोप्प आहे ... त्याला एका गोल खोलीत घेवून जा आणि एका कोपऱ्यात बसायला सांगा.
-------------------------------------------------------------
टिचर - बंटी तु ''माझा कुत्रा'' या विषयावर लिहिलेला निबंध अगदी तंतोतंत तुझ्या भावाने लिहिलेल्या निबंधाप्रमाणेच आहे. तु त्याची कॉपी केलीस की काय?
बंटी - नाही सर... पण तो कुत्रा एकच होता...
-------------------------------------------------------------
चिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.
**बंटू : अरेरे बिच्चारी.
**चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.
**बंटू : तुला कसं रे कळलं.
...**चिंटू : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू… तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझीचप्पल करकरीत नवीन आहे.
-------------------------------------------------------------
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook