जीवनात एकदा तरी करावी
सफर चांदण्यांची,
तेव्हा सोबत असावी
जीवलग मैत्रीणींची.
मजाच और असते
मैत्रीणीं सोबत फिरण्याची,
चांदण्या रात्री नसे भिती
कोणी पाहण्याची.
चांदण्या रात्री दाखव तिला
आकाशातील तुटणारे तारे,
समजू दे तिलाही तुझ्या
जीवनाचे गुपीत सारे.
मागू दे तिला तिच्या
मनातील इच्छा,
तूझ्याही असू दे तिला
मनापासून सदिच्छा.
जीवनात एकदा तरी करावी
सफर चांदण्यांची,
तेव्हा सोबत असावी
जीवलग मैत्रीणींची.
Post a Comment Blogger Facebook