तो - मुळात पत्रकारा चा पिंड त्याचा त्यामुळे स्वतः चे म्हणणे दुसऱ्याच्या गळी उतरवणे अगदी सहज रीत्या आलेच..😂 अगदी सहज असं नाही  पण त्याने तिला मनवले होतेच.. आता रात्री चे कॉल्स बंद होऊन दिवसा कॉल, msg चालु झाले होते त्यांचे. तिच्या वाढदिवसापासुन पुढे सहा महिन्यात खुप चांगले मित्र झाले होते ते एकमेकांचे.. त्याच दरम्यान आलेल्या निवडणुकी chya कामामध्ये तो प्रचंड बिझी.. मुलाखत घ्यायला जायच्या आधी हा दर वेळी ट्रायल तिच्या वर karaycha.कधी लालू प्रसाद यादव बनावं लागायचं तीला तर कधी शिवसेना मध्ये नुकतेच प्रवेश केलेले आमदार आदेश बांदेकर.. ती  दर दिवशी एक नवीन पात्र साकारत होती.प्रश्न ही त्याचेच अन् उत्तर ही त्याचीच.. फक्त तिने ते ऐकायचं, बरोबर बोलतो आहे ना ते सांगायचं. तिला त्यातील राजकारण काहिच कळायचं नाही.. फक्त तिला इतकचं कळत होत की त्याला तिची एक मैत्रीण म्हणुन गरज आहे अन् ती ते नात इमानदारीने निभावत होती..... 

एका शहरात राहून अजुन भेटायचा योग मात्र जुळून आला नव्हता.. घाई त्याला ही नव्हती अन् तिलाही. जितका वेळ एकमेकांना देत होते त्यात समाधानी होते ते.

3 मार्च 2009 - आज सकाळी सकाळी वेळे च्या आधी त्याचा कॉल, 10 min मध्ये तु ओंकारेश्वर च्या बस स्टॉप वर पाहिजे मला, इतकं बोलून कॉल कट.तो ईथे आला असेल याची कल्पना आली होती तिला..ऑफिस ला निघालेली ती नेहमी च्या रोड ला बगल देऊन पावल ओंकारेश्वर बस स्टॉप कडे वळवली तीने..

जवळ जवळ वर्ष भर ज्याचा आवाज ऐकत होती.. आज त्याला प्रत्यक्षात पाहणार होती.  मनात प्रचंड भीती, दडपण.. समोर भेटल्यावर आपला आवाज निघेल ना? आवडेन की नाही मी त्याला असे हजार प्रश्न एकाच वेळी डोक्यात रुंजी घालत होते. एक क्षण वाटल पळून जाऊ. नकोच जायला समोर.. जे आहे ते बर चाललं आहे. 

पणं ओळखत होती ती त्याच्या स्वभावाला . जावं तर लागणारच होत..बस स्टॉप वरील गर्दी चे चेहरे न्याहाळत पुढे सरकणारी ती..अन् बस स्टॉप पासुन थोड्या अंतरावर उभा राहून तिला  बिनदिक्कत न्याहळणारा तो.. तिने कॉल करायला मोबाईल हातात घेताच.'ये मिस कॉल' अशी जोरदार त्याची हाक.

आवाज्याच्या दिशेने समोर पाहताच जवळ जवळ 6 फूट उंचीचा, निमगोरा, white t-shirt. त्याखाली डेनिम ची फाटकी (fashionable )जीन्स.. रॉयल एनफिल्डला  टेकुन हाताची घडी घालून रुबाबात उभा असलेला प्रसन्न चेहऱ्याचा तो तिच्या नजरेस पडला..😍😍

 yelllow and green combination असलेला 

Pure कॉटन चा सलवार कमीज परिधान केलेली ती.. साडेपाच फूट उंचीची,  लांबसडक काळेभोर दाट केस, बऱ्या पैकी गोरी, सडपातळ बांधा असलेली ती कमालीची गोंधलेली, ब्राऊन रंगाच्या डोळयात एक वेगळच दडपण, खांद्याला पर्स, दुसऱ्या हातात त्याच्या साठी आणलेल्या खाऊची ची थैली, पुढे जावं की मागे 😀😀😂 या विचारात असताना अगदी तिच्या अगदी समोर उभा राहिलेला तो.." पाठी जायचा विचार करतेयस की काय" म्हणत वातावरण हलक करण्याचा त्याचा प्रयत्न. Yeh चिल्ल! मला वाटलच होत कॉल वर बोलताना वाघीण होणारी तु भेटल्यावर भित्रा ससा होणार म्हणून च मी ही प्लेस निवडली आहे. तो मात्र जसा कॉल वर बोलायचा तसाच होता अगदी बिनधास्त,, मनमोकळा,, मैत्रीपूर्वक वागणारा..

ती मात्र बावरलेली,, काय बोलू न कळलेली.. मोजून 15 min ची vagre भेट.. 

पण त्या भेटीचा आनंद, खुषी, समाधान दोन्ही चेहर्यावर झळकत होता.एक स्वप्न पूर्णत्वास जातं होत तिचं हि अन् त्याचं ही.. 😍😍😍😍🥰

तिला safe फिल व्हाव म्हणून माणसांच्या गराड्यात भेटणारा तो तिच्या मनात कायमचा घर करून गेला..

 पुढील भेटीची ओढ लावुन गेला.😍

(#थोडक्यात त्याच्या बद्दल=त्याच्या ग्रुप सहित रुपारेल मधून रस्टिकेट केलेला तो प्रंचड मस्तीखोर, लोकशाही चा चौधा आधारस्तंभ पत्रकार. तितकाच हुशार, नाविन्याचा ध्यास असलेला,, कमी वयात स्वकतृत्वावर नावारूपास आलेला तो, समाजासाठी सतत काही तरी करत राहण्याची जिद्द, एक उत्तम श्रोता त्याहून एक उत्तम व्यक्ता.. एरियातील गोपिकांचा कान्हा 😀 एक उत्तम फोटोग्राफर.. गडकिल्ल्यांचे प्रचंड वेड असलेला तो. अजुन काही गुण पुढील भागात उलगडतील) 

क्रमशः.

साभार - लेखिका: राजेश्वरी शिगवण

Post a Comment Blogger

 
Top