सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य
आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा
रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता,
सिंहगडासारखी शौर्यता,
सह्याद्रीसारखी तुला उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
सूर्यासारखा तेजस्वी हो.
चंद्रासारखा शीतल हो.
फुलासारखा मोहक हो.
कुबेरासारखा धनवान हो.
माता सरस्वती सारखा विव्दान हो.
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी
श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो.
व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं, हीच शुभेच्छा !
आज तुझा वाढदिवस
वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो..
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
जगातील सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू द्या!
कारण तुम्ही नक्कीच सर्वोत्तम लोकांपैकी एक आहात.
माझ्या सर्वात जवळच्या आणि जुन्या मित्राला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !
तुझ्यापेक्षा मला कोणीही चांगले ओळखत नाही.
तुझी मैत्री ही माझ्यासाठी घडलेल्या
सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुला वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा
मला आशा आहे की
तुला तुझ्या आयुष्यात पाहिजे असलेल्या
प्रत्येक गोष्टी दुप्पट मिळोत !!
Post a Comment Blogger Facebook