मुंबई पुणे मुंबई पिक्चर च्या गाण्यातील ओळी पुढे देत आहे ...


कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू ................
कोसळत्या धारा
थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा
भिजलेल्या वाटा

चिंब पावसाची ओलीरात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी
रातराणी वेड्या जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणांत
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

Post a Comment Blogger

 
Top