ती अशी काय झोका घेत होती,
जणू मला एका कवितेला मौका देत होती.

हृदयाचा ठोका ही चुकला आणि मौका ही हुकला,
जेव्हा तिच्या नजरेचा तीर माझ्या दिशेने सुटला.
घायाळ झालो तिच्या त्या नजरेला बघून,
मलाच आठवेना मग मी कोण, कुठला.

हद्द तर तेव्हा झाली जेव्हा तीने एक डोळा मिटला,
प्रेमाचा मार्ग झाला मोकळा मनात लाडू फुटला.

ती झोका घेत होती नजरेचे तीर सोडत होती,
प्रेमाने जवळ ओढत होती, मनात लाडू फोडत होती.

प्रेमाचे कोडे अजून उलगडत होते.
दोन प्रेमी एकमेकांना बिलगत होते.
प्रेमाच्या त्या झोपाळ्यावर
प्रेमाचा झोका घेत होते.

कवी,
विशाल गावडे.

Post a Comment Blogger

 
Top