आज किती दिवसांनी वाटलं कि तू माझी नाही...
वेड का तू लावलेस मला इतके सांगशील का काही...

उगाच मनाचे दार मी उघडले तुझ्यासाठी,
आता ते फक्त तुझीच जणू वाट पाही...




का ह्या निष्ठुर देहाला तू परत पाझर फोडलास गं,
होतो ना मी एकटा, का हा धागा तू तोडलास गं.

आता सांग कसं जगायचं ते,
कसं तुझ्याविना मरायचं ते......




विझता विझत नाही आहे आग माझ्या मनातली,
अवस्था कशी माझी ही एका क्षणातली....

साभार - कवी : प्रथमेश राउत

Post a Comment Blogger

 
Top