स्वप्नील डोळ्यांची उघड झाप करताना जेव्हा तू बोलायचीस माझ्याशी 
कान माझे चक्क फितुरी करायचे, डोळे मात्र होते प्रामाणिक माझ्याशी 
"अस काय रे बघतोस हरवल्या सारखा?" तू म्हणायचीस नेहमी. 
"अग मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यात, सारखा हरवतो माझा मी!" 
"तुझा आपला काही तरीच" तू टिंगल करायचीस माझी 
पण ते लाजरं खळीतला हसू तुझं अगदी खरं बोलायचं माझ्याशी 
सूर्य अस्ताला घाई घाईने जाने अन तुझं गडबडीने उठणं 
रेंगाळलेली किरणं गोळा करत माझं उद्याची वाट पहाण.... 
"येते रे" म्हणतानाची तुझी व्याकूळ नजर, 
उधळ पावले अन, ओली पापण्यांची झालर, पाठमोरी डोळ्यात साठवलेली तू 
अन अजूनहि हरवलेला मी 
अन अजूनहि हरवलेला मी.............................

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top