थांबव ग राणी
तुझ मिस कॉल देण,
मोबाइल च बिल झालय
आता ग जीव घेण,

मिस कॉल देण्याची
तुला हौस ग न्यारी,
बिल मात्र पडतय
माझ्या ग पादरी....

अलार्मच्या आधीही
येतो तुझा मिस कॉल,
माझ्याही आधी होते
माझ्या मोबाइलची सकाळ,

कॉल करायला राणी
तुला कधी जमतच नाही,
चुकून केलाच कधी तर
५ मिनिटापेक्षा जास्त बोलायच नाही,

मी कॉल केल्यावर मात्र
तुला तासनतास बोलावस वाटत,
तुझ बोलन वाढलेल पाहून
काळीज  माझ फाटत (धडधडत)

तुझ हे मिस कॉल देण
आता रोजचच झालय,
माझाही तुला कॉल कारण
मग साहजिकच झालय,

पण ....
मी ही आता ठरवलय
तुला कॉल नाही करायच,
आलाच तुझा मिसकॉल
तर तुलाच परत मिसकॉल द्यायच,

तुझा कॉल येईपर्यंत
तुला मिस कॉल देत रहायच,
आणि तू कॉल केल्यानंतर
मुद्दामहुन जास्त वेळ बोलायच,

तुलाही कळू दे आता
कॉल करण्याच दु:ख,
मलाही मिळू दे मग
थोडस मिस कॉल देण्याच सुख :)

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top