मराठी टायपिंग साठी आतापर्यंत ब-याच सुविधा उपलब्ध होत्या. त्यातले वेगवेगळे पर्याय मी स्वत: वापरून देखील बघितले होते. पण गुगलने उपलब्ध केलेली मराठी टायपिंग साठी सुविधा सर्वात चांगला आणि सोपा पर्याय मला वाटला. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपण नॉर्मल रोमनमध्ये ज्या प्रकारे मराठी टाईप करतो त्याप्रमाणे टाईप केली तरी ती युनिकोड मध्ये व्यवस्थित रुपांतरीत केली जाते.
उदा :
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. जय हिंद.
.
वरील सगळी वाक्ये हि मला अशीच देवनागरीत लिहियाची झाल्यास मला फक्त खाली दिलेल्या लिंकवर जाऊन असा टाईप करावं लागेल.
.
bharat majha desh ahe. sare bhartiy majhe bandhav ahet. majhya deshavar majhe prem ahe. jay hind.
.
इतकं सरळ साधं सोपं आहे मराठी टायपिंग.
मला खात्री आहे गुगलच्या या सुविधेमुळे तुम्ही सर्व जण इंटरनेट वर जास्तीत जास्त मराठी वापराल.
.
खाली दिलेल्या लिंकवर मराठी टायपिंग उपलब्ध आहे.
http://www.google.com/transliterate/indic/Marathi
.
तुम्ही सध्या मराठी टायपिंग साठी कुठली सुविधा वापरता?? आणि हि सुविधा तुम्हाला कशी वाटली याची चर्चा इथे नक्कीच करा. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

  1. आभारी आहे मी तुमचा तुम्ही या बद्दल सांगितलत
    वा खूपच छान आहे . खुंप मोठी मदत होईल या मुळे .
    धन्यवाद

    ReplyDelete

 
Top