मनाने हृदयाला कळवलं, तेही तुझंच होऊन राहिलं.
मी गप्प बसायचं ठरवलं,
पण पायांनी तुझ्याच मागून पळवलं.

मरणाला सांगितलं मी मला घेऊन जा तुझ्याकडे,
मरण म्हणाले मला माझे ऐकशील का थोडे.
इथेही तिच्याच आठवणी तू काढत राहशील,
इतक्या दूर येऊन देखील तू सारखा तिलाच पाहशील.

सार लक्ष तुझ्याच आठवणीत,
म्हणून लक्षच दुसरीकडे नेलं.
फिरता फिरता तेही तुझ्याच दुनियेत हरवलं,

मनाला म्हणालो मी विचार करू नकोस तिचा.
त्याने ही पाठ फिरविली,
पण हातांना कोण सांगणार माझ्या ,
त्यांनी तुझीच कविता गिरवली.

आयुष्यभर जाणवणाऱ्या जखमांसारखा वाटे तुझा नकार,
तेव्हाच जातील जखमा त्याच्या खुणा,
जेव्हा देशील तू मला तुझा होकार.

कधी तू आनंदाने मला सांगायला येशील,
अन म्हणशील कि तू माझा होशील ?
होईल तेव्हाच माझ्या प्रेमाचे सार्थक,
तेव्हाच माझ्या प्रेमाला खरा न्याय देशील.

साभार - कवी: विशाल गावडे.

Post a Comment Blogger

 
Top