श्वासात तर तुही वसतो माझ्या
तू ऐकतो म्हणून बोलतेय मी
तू नसला की हृदयाच्या
कप्या- कप्यात फक्त काळोख पाहते मी
साग न तू ,
विसरू शकतो मला.......?
तुझे अश्रू ओघाल्न्याआधीच
मला समजलंय तू भावूक आहेस
माझ्यासाठी ............
विसरण्याचा प्रयत्नही करू नकोस
हृदयाचे ठोके चुकतील माझ्या ही
साग न तू ,
विसरू शकतो मला.......?
चांदण्याच्या राती अलगद उचकी लागते
मग मी तुझ नाव घेते
नाव घेताच तुझ, मग ती ही शांत होते
मग माझ्या वेड्या मनाला मीच सागते
बघ तो .......
विसरू शकत नाही मला .....
पावूल पुढे पुढे टाकतेय
तुझ्या कडे येण्यासाठी
फुलली आहे जी कविता ती ऐकण्यासाठी
हृदयाची साद हृदयाला देण्यासाठी
साग न तू ,
विसरू शकतो मला.......?
साभार - कवियेत्री : प्रिया उमप
Post a Comment Blogger Facebook