दररोज घरी येता जाताना
नजरेत तुलाच शोधायचे ,
आणि कधी तू दिसलास तर
आपोआप ओठांवर हास्य उमलायचे ,

दिवसभर college असल्यामुळे
तुला फार काळ न्याहाळता येत नव्हतं,
पण जेव्हा केव्हा समोर येशील
तेव्हा नकळत हात तुला hi करण्यासाठी उठायचे,

एके दिवशी बोलता बोलता
मनातल्या feelings बोलून गेले,
आणि त्यातूनच एक
सुरेख नाते जन्माला आले,

बरेच दिवस झाले
दोघे सुखात होते,
पण अचानक काय झाले माहित नाही
पण त्याने बोलणे बंद केले,

त्याचा अशा वागण्याने
तिने खूप सोसले,
पण मग हळूहळू स्वतःला सावरले ,
 आणि पुन्हा एकदा नव्याने जगणे सुरु केले,

लोकांचा नजरेत आता ती खुश होती,
पण मनात मात्र एकच आस होती,
एकदा ....एकदा तरी परत येशील का माझ्याकडे ,
पुन्हा एकदा अनुभवायला त्याच प्रेमाचे गोडवे.


साभार - कवियेत्री : तेजश्री सावकारे

Post a Comment Blogger

 
Top