एकूणच स्त्रियांची वैचारिक पातळी (??) आणि शाश्वत उत्तरांचा अभ्यास करुन आम्ही प्रेमपत्राचा एक नमुना बनविला आहे. तो पुढे देत आहे.

( पहिली गोष्ट म्हणजे मजकुर हा ठळक काळ्या रंगातच असावा त्यासाठी गुलाबी किंवा इतर कोणतेही मिळमिळीत रंग वापरु नयेत. त्याचप्रमाणे पत्राची सुरुवात ही प्रिय किंवा तत्सम समानार्थी शब्दांनी करु नये. हे आधुनिक मराठीतील सर्वात कालबाह्य शब्द आहेत.)

हे पहा अमुक तमुक, ( येथे मुलीचे पूर्ण नाव अपेक्षित . यामुळे हे पत्र चुकुन तिच्याकडे आलेले नसून तिच्यासाठीच लिहीलेले आहे याची तिला जाणीव होते.)

गेल्या ______ काळापासून आपण एकमेकांना चांगले ओळखत आहोत. ( चांगले हा शब्द शक्य तितका सुवाच्य आणि ठळक लिहावा.) म्हणूनच मी तुला पत्राद्वारे लग्नाची मागणी घालत आहे. तू एक हुशार मुलगी आहेस हे मला माहीत आहे . त्यामुळे तुला धक्का बसला असेल. त्यामुळे एका आठवड्याच्या मुदतीनंतर मला भेटून तुझा होकार कळव. भेटण्याची जागा आणि वेळ मला फोन केल्यानंतर तुला कळेलच .

तुझाच ,

तमुक अमुक (येथेही पूर्ण नांव )

काही शंका असल्यास लगेच निरसन केले जाईल. यशाची हमखास खात्री .

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top