" इश्य..... " म्हणून मन खाली घालतच नाहीत.....
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत,
" नवीन ड्रेस का ? " विचारले तर ह्यांना येतो संशय!!
" नाही रे, जुनाच आहे " म्हणून बदलतात विषय.
नकट्या नाकावर लटका राग दिसतंच नाही,
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत,
मी घाऱ्या डोळांचे कौतिक करावे,
मग तिनेही गालात खुदकन हसावे...
कसलेच काय........ आज काळ गालांना खळ्या त्या कशा पडतच नाहीत....
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत,
उद्या घोड्यावर बसून येईल एखादा उमदा तरुण,
" होशील का माझी राणी" विचारील हातात हात घेऊन....
गोड गोड स्वप्ने यांना आता पडतच नाहीत....
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत,
पोर लग्नाची झाली म्हणून घरी आई- बाप काळजीत,
" माझा नवरा मी केव्हाच शोधलाय " - त्या सांगतात ऐटीत...
घरून होकारासाठी थांबतच नाहीत......
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत...... :)
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook