तार्‍यांची मैफ़ल रोज रात्री जमायची,
रात्र वाढत जाताच ती खुप रंगायची

एक चांदणी मात्र सर्वांमध्ये उठून दिसायची
नजर माझी तिला रोज नियमित पहायाची

अंतर आम्हा दोघांमध्ये फारसं असं नव्ह्तंच
दूर जिव असले तरी प्रेम त्यांच्यात असतंच

आयुष्याचं ती माझ्या खुप मोठा आधार होती
निराशेच्या कालोखात आशेची नवी पहाट होती

तिची ती चमक डोळे दिपून टाकायची
अफाट सामर्थ्याने ती अचंबित करुन जायची

दुःख सारं लपवुन तिचं, नेहमी छान हसायची
इतर तार्‍यांच्या नकळत मला गपचुप पहायची

शब्दांमध्ये तिच्य एक वेगलीच लय असायची
मनमोहक नजर तिची आपलंसं करुन सोडायची

पाहताच तिला वार्‍याची झुलुक स्पर्शुन जायची
गालातल्या तिच्या खलीमध्ये मला गुंतवुन टाकायची

असं हे आमचं छोटंसं प्रेमप्रकरण होतं
सर्वांच्या नजरेपासुन दूर एक छोटं विश्व होतं

तिच्यासाठी मी आणि माझ्यसाठी ती होती
चांदण्यातलीच ती एक माझी प्रेयसि होती.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top