( लय्भारी,,,म्हंजी अक्शी फुल्टूफट्याक ...वाचायला थोडा त्रास झाला ....पण खूप गमतीशीर संवाद आहेत ..मूळ लेखक कोण हे माहित नाही )
अलीकडेच सातार्ला (साताऱ्याला) जाण्याचा योग आला. इथेही मोबाईल (इकडे शेल्फोन म्हणतात)धारकांची वाढती संख्या सहज नजरेत भरण्यासारखी होती. ज्याला पाहावे त्याच्या मोबाईल हाताला आणि हात कानाला. इथल्या शेल्फोनधारकांच्या संभाषणात 'र्बमगठिव्का' आणि 'र्बमगठिव्तो' हे दोन शब्द पुन:पुन्हा उच्चारले जात होते. ऐकून ऐकून कान आणि मेंदूचं पार भेंडाळं व्हायला आलं, मात्र 'र्बमगठिव्का' ही काय भानगड आहे याचा मला काहीच उलगडा होत नव्हता. कुतुहलापोटी मी प्रत्येक शेल्फोनधारकाचे संभाषण अगदी जीवाचे कान करून ऐकू लागलो. यातून एक गोष्ट मात्र फायद्याची ठरली ती म्हणजे मोबाईल फोनच्या संबंधित बऱ्याच इंग्रजी शब्दांच्या देशीकरणाच मला चांगलाच उलगडा झाला. खालच्या बाजारातून वरच्या बाजारापर्यंत फेरफटका मारताना 'र्बमगठिव्का'चा उलगडा होईपर्यंत जी जी संभाषणे मी ऐकली त्यातले काही तुकडे जरी आपण ऐकले तरी आपल्या शब्दसंचामध्ये नवीन शब्दांची नक्कीच भर पडेल. तर ऐकूया
संभाषण नं. १.
क : आर्कवा धर्न ट्राय कर्तोय तुजा आप्ला सार्खा आव्टाफकव्रेचज दाव्तोय. कंचा हाय तुजा?
ख : माजा यार्टेल (एअरटेल). तुझा ?
क : माजा ब्येस्नेल (बी.एस.एन.एल.)
(कव्हरेज या शब्दाला इकडे असंख्य पर्याय आहेत. कौरेच, कौरेज, कव्रेज, करवेज आणि कर्वेजसुद्धा.)
ख : आर्आता आमच्याकड आयडय़ान् वडाफोनचंबी टावरं झाल्याती. आन् रिंज (रेंज) बी बरी घाव्ते.
क : आता हा कंचा म्हंन्लास वडा क् काय त्ये.
ख : हौ ऽऽ वडा वडाच. आर्पय्ला आरिंज म्हंजी संत्र न्हव्तं का, मगं हुच (HUTCH) झालं. आनात्ता वडाफोन.
आणखी बरंच काही संभाषण होत असतं. त्यात अधूनमधून 'र्बमगठिव्का' व 'र्बमगठिव्तो' ही चालूच असतं.
* * * * *
संभाषण क्र. २..
ग : आर्तुहाय्स कुठं, पंध्रा दिस झालं सार्खा ट्राय कर्तुय सरख आप्लं वेट्वची टॅप वाज्तीय. बर्तुजा म्हात्रा आजा कसाय ? ('कसाय'चा अर्थ 'कसा आहे' असा घेणे)..
घ : आर्आजाला गाच्कुन पंध्रा दिस झालं की.
ग : हात्तिच्यामाय्ला! र्आमग येकाद् यश्मेस करायचा का न्हाय.
आणखी बरंच काही आणि अधूनमधून 'र्बमगठिव्का'.
* * * * *
संभाषण क्र. ३
ट : आर्तुजी क्वालर्टुन (कॉलरटय़ुन) बादाल्ली वाट्टं.
ठ : व्हय. जाला की म्हैना, आन् रिंग्टुनबी बदली केलीया. कराची का तुला डांलोड (डाऊनलोड)?
ट : करू की मंग कवातरी. तुज्यात कोंचं शिम्कार्ड हाय म्हंलास.
ठ : माज्यात बीप्येल (बी.पी.एल.)
ट : टॉक्टाय्माचंय का बिलाचंय?
ठ : त्ये काय ठावं न्हाय गडय़ा. तातु म्हन्ला व्हता पिर्पेट (प्रीपेड) क् काय हाय. पन रिंज न्हाय गडय़ा.
ट : आमच्याकड् रिलांसनटाटाची बरी घाव्ते (रेंज). घरात वाईच नेटवरचा (नेटवर्कचा) प्राब्लेम अस्तो. बाकी बाज्रारात झ्ॉक.
आणखी बरंच काही बोलणं होत असताना मध्ये मध्ये 'र्बमगठिव्का' 'र्बमगठिव्तो' होतच असतं.
* * * * *
संभाषण क्र. ४
ड : तुजा हँशेट कोंचा हाय रं ?
ढ : माजा नोक्या. लाँग्लाय्फची (लाँग लाईफ) बॅट्री नोक्याचीच गडय़ा.
बाकी मोट्रोला, सामसुम, येरिक्शन, येल्ची बिल्चीचं काय बी खरं न्हाय बग.
तुजा कोंचा हाय ?
ड : माजाबी नोक्याच हाय. यफ यम, रेडोन्क्यॅम्रा (रेडिओ अन् कॅमेरा)बी हाय.
ढ : माज्यात बी हाय रं. माज्यात विडो
(व्हिडीओ)बी हाय आन् चार जीभीची (जी.बी.) मेम्री पन् हाय.
आणखी बरंच काही बोलणं होत असतं आणि मध्ये मध्ये र्बमगठिव्का. या सगळ्यांबरोबरच मध्ये मध्ये 'आर्पन' (अरे पण),
'हात्तिच्यामाय्ला', 'च्या माय्ला' आणि 'चॅआय्ला' अशा ठराविक शब्दांचा योग्य आणि अयोग्य ठिकाणी भरपूर वापर होत असतो. बाकी सर्व कठिण शब्दांचे अर्थ मी लावू शकत होतो परंतु हे 'र्बमगठिव्का' माझी पाठ सोडत नव्हतं. शेवटी न राहवून एकाचं तोंड आणि फोन बंद झाला तेव्हा त्याला मुद्दामच विचारलं.
मी : हे 'र्बमगठिव्का' म्हंजे काय राव?
नाना पाटेकरच्या स्टाईलमध्ये तो म्हणाला, 'भायर्न आलाय दिस्तासा.'
मी : हो, मुंबईहून.
मग विक्रम गोखलेच्या स्टाईलमध्ये (विथ अॅक्शन) त्याने मला समजावलं. 'र्बमगठिव्का' म्हंजी, र्बर ऽऽ मंऽग ऽऽ ठिवू ऽऽ क्का. म्हंजी फून (फोन) ठिवू ऽऽ क्काऽ'
(हात्तिच्या मा.. माझ्या तोंडात आलंच होतं. मात्र ओठाबाहेर फुटू दिलं नाही.) 'र्बमगठिव्काच्या' गुंत्यातून एकदाचा मोकळा झालो. डोकं हलकं हलकं झालं. इतका साधा सरळ शब्द मला कळला कसा नाही. विचार करतच होतो इतक्यात माझा शेल्फोन वाजला. मी हॅलो बोलायच्या आतच पलीकडून जोरात आवाज आला.
'आर्हाय्स्कुठं तू? कवा धर्न ट्राय कर्तुया तुझा सार्खा आप्ला सीचहॉप (स्वीच ऑफ), वेट्व नाय्त आप्लं बीजी.'
मी : कोण बोलताय ?
पलिकडून : आर्मीसर्जा (अरे मी सर्जा).
या सातार्करांची सर्व शब्द जोडून एक वाक्य एका शब्दात बोलण्याची कला मात्र फक्कड हाय बगा. मी कोणा सर्जाला ओळखत नव्हतो. त्याच्याकडून चुकून माझा नंबर लागला गेला असावा. तरीसुद्धा थोडी मजा करावी म्हणून जोरात ओरडून-
मी : आर्पन हिथ्लं नेटवर पार ढय़ापाळंय बग. माजा आव्टाफकौरेचज झालाय. बाज्रात पोचल्याव मंग मीच लावतो तुला, र्बमगठिव्का ?
सर्जा : आर्पन.. मला... आर्र..
त्याचं बोलणं तोडत मी 'र्बमगठिव्तो' बोलून (जवळ जवळ ओरडूनच) माझा शेल्फोन सिचहॉप केला.
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
Related Posts
- रक्षाबंधन मराठी विनोद - Raksha Bandhan marathi vinod jokes30 Aug 20231
रक्षाबंधन मराठी विनोद - Raksha Bandhan marathi vinod jokes ...Read more »
- प्रेम म्हणजे प्रेम असत ..पशु पक्ष्यांचही सेम असत ( असाही प्रेमदिवस ...Funny Valentines Day )11 Feb 20230
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी Read more »
- नवरा बायको वर मस्त मराठी जोक्स - Funny Marathi Jokes on Husband & Wife08 Dec 20220
मित्रानो जोक्स आवडले ना ? आजून असेच मजेदार मराठी जोक्स वाचण्यासाठी आपल्या फेसबुकवरील मराठी मस्...Read more »
- सासू - सून मराठी विनोद, - Marathi Joke01 Dec 20220
सून काम करत नाही म्हणून सासू नाराज होती. तिने मुलाला बोलावलं आणि सांगितलं, "उद्या म...Read more »
- होळी महात्म कथा - होळी म्हणजे वाईट विचारांचे दहन - Happy Holi Story & Importance13 Mar 20250
होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे. ग्रामी...Read more »
- आपट्याच्या पानाला सोन्याच मोल कां? - मराठी कथा - Dasara Special Marathi Story12 Oct 20240
आपट्याच्या पानाला सोन्याच मोल कां आणि कसं आल ह्याबद्दल कथा सांगितली जाते, ती अशीफार फार वर्षापूर्व...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
awsome piece of information, I had come to know about your website from my friend vinod, indore,i have read atleast seven posts of yours by now, and let me tell you, your blog gives the best and the most interesting information. This is just the kind of information that i had been looking for, i'm already your rss reader now and i would regularly watch out for the new posts, once again hats off to you! Thanks a ton once again, Regards, Marathi Vinodi Ukhane
उत्तर द्याहटवाZAKKAS SAMBHASHAN
उत्तर द्याहटवा