१.स्वप्नांच्या मागे धावु नकोस,
 स्वप्न सगळीच पूर्ण होत नाहित...
उरतात ते फक्त उसासे,
अश्रु पण खाली ओघळत नाहित.... 
२.आयुष्यात झालेली जखम,
कधितरी भुलवावी लागेल......
तुलाही आता, आयुष्याची
नवीन सुरुआत करावी लागेल........

३. नसतात कधी आठ्वणी
            इतक्या जपायच्या............
क्षणात त्या चटकन
            डोळ्यात पाणी आणतात .........
४. हृदय काहितरी सांगतय तुला,
 वाट पाहते आहेस तु कोणाचितरी......
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोनाच्यातरी मनाची रानी........
५. दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे
यात फरक एवढाच,
की दुखणार्या मनाला आवर घालता येत नाही ,
आणि गुलाबाला तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही......

६. जुळत  नसतात बंधन
कधीही इतक्या सहज ....
कशी आलीस तु जिवनात माझ्या,
आता वाटते आहे ति फक्त तुझिच गरज..............
७.भावना ओंजलित घेउन नको जगुस ,,,,,,,
त्या व्यक्त करन्यात मजा आहे...
डोळ्यात अश्रु नेहमीच येतात,
ते पुसुन हसन्यात मजा आहे..............
 साभार आणि कवी :  प्रथमेश राउत.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top