काय असतं हे प्रेम, तिला कधी कळलंच नाही,
काय हा सुख-दुःख यातला फरक,तिला कधी कळलंच नाही,

तिच्या स्वभावातला गोडवा आणि चेहर्यावरचं हास्य मला वेडं करायचं,
पण माझा रंग-रूप, यापेक्षा मोठं माझं मन, तिला कधी कळलंच नाही,

तिचंही खुप प्रेम माझ्यावर, जीवन-मरणाच्या शपथाही तितक्याच घट्ट,
पण नातलगामध्ये स्वतःला गुरफटून, प्रेमाला छेद देणं, तिला कधी कळलंच नाही!

आयुष्यात फक्त सुखाची साथ लाभत नाही, दुःखपण पाठ सोडत नाहीत,
पण आपल्या एका निर्णयाने, एक आयुष्य बरबाद होतंय,तिला कधी कळलंच नाही!

तिच्यासाठी केलि साऱ्या आयुष्याची माती, त्याच मातीची आज मी कबर करतोय,
पण त्याच्याकडे परत जाउन, करावी आपण त्याच्या प्रेमाची कदर, तिला कधी कळलंच नाही!

अजुनही तिची वाट पाहतो आहे, दुखात अश्रु ढाळतो आहे,
माझ्या आशांना पूर्णविराम देऊन,करावं दोघांच आयुष्य सुखी,
ही निव्वळ कल्पना, तिला कधी कळलंच नाही!

साभार - कवी : प्रथमेश राउत

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top