काल मरून मी स्वर्गात गेलो
इंद्र नाराज होता, रंभा तर फारच चिडलेली
एकंदरीत चित्र चिंताग्रस्त
माझ्या कर्मकांडाची फ़ाईल स्वर्गात हि रखडलेली
इंद्र म्हणाला प्रेम करायचा प्रेम करायचा
म्हणून तू तिच्यावर किती रे प्रेम करायचा
तुला प्रेम वाटता वाटता
माझ्या प्रेमाचा स्टोक मलाच कमी पडायचा
ती तुझ्याकडे ढुंकून हि पाहत नसली तरी
तू तिच्यासाठी रात्रं-दिवस झुरायचास
तिने पायाने लवंडली तरी
प्रेमाची घागर तू परत काठोकाठ भरायचास
तिने तुझ्याकडे पाहिलं नसलं तरी
हि रंभा तुझ्या प्रेमाच दररोज लाईव टेलिकास्ट पहायची
दयेलाही दया येईल असे तुझे प्रेम पाहून
हि रंभा ढसा ढसा रडायची
सौंदर्य नको अमरत्व नको
मी तुझ्या सारखा प्रेम करेल असा वरदान मागायची
शिका जरा त्याच्याकडून
असा वरून मलाच गाल फुगवून सांगायची
येवढ माझा नाव घेतला असतास तर
मी हि तुला पावलो असतो
तुझ्या प्रत्येक संकटात मदतीला
स्वताहून धावलो असतो
येऊ दे तिला वर एकदा
सरळ तिला नरकातच पाठवतो
बघतोच मग तिला
तू कसा नाही आठवतो
तसा म्हणताच बोललो
म्हणालो ती नरकात जाणार असेल
तर मलाही तिथेच पाठवशील
नरक हि मला तिथे स्वर्गाहून सुंदर भासेल
का म्हणून तिने
माझ्याकडे यायचं
तहानलेल्याने पाण्याकडे
का पाण्याने तहानालेल्याकडे जायचं ?
मी साधारण मनुष्य, ती रुपाची राणी
मी साचलेलं पाण्याचं डबकं, ती झुळझुळ पाणी
मी खोबरेल तेल, ती अत्तरदाणी
मी हिमेश चा ऊऊऊऊ, ती लताची गाणी
मी खुरटे केस, ती लांब सडक वेणी
मी आरे च दुध, ती शुध्द लोणी
असा बोलताच इंद्राने चक्क हात जोडले
सकाळच्या पहिल्या गाडीने परत पृथ्वीतलावर धाडले
म्हणाला माझ्या संसाराला आग लावायचा तुझं काही तरी कपट आहे
सांगून सुधारणार नाही असा तू कुत्र्याचा शेपूट आहे
तू साधारण असलास तरी
तरी तुझं प्रेम असाधारण आहे
तिन्ही जगावर मात करेल
असा तुझ्याकडे कारण आहे
--
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.