ओढ
तुझे हसने
सर्वापेक्षा ही गोड आहे
तुझ्या त्या हास्या कडेच तर
माझ्या प्रेमाची ओढ आहे
तुझे हसने
सर्वापेक्षा ही गोड आहे
तुझ्या त्या हास्या कडेच तर
माझ्या प्रेमाची ओढ आहे
स्वप्ने
माझी सर्व स्वप्ने
वाळुत पावलं सारखी असतात
दुसरी उमटली की
पहिली लाटेत विरुन जायची
एवढ - तेवढ
एवढ्या तेवढ्यान होत असत
तर मी तेवढच केल असत
पण माहीत आहे मला ते तेवढ
जन्मभर पुरल नसत
आशा
आजही मन जागत होते
तुझ्या येण्याच्या आशेवर
आणि डोळे लागुन राहिले होते
तुझ्या येण्याच्या वाटेवर
भेट
तुझ्या प्रेमात मी काहिही करेन सखे
पण जीव मात्र देनार नही
कारण माहीत आहे मला
त्या नंतर आपण भेटणार नाही
तुझ्या प्रेमात मी काहिही करेन सखे
पण जीव मात्र देनार नही
कारण माहीत आहे मला
त्या नंतर आपण भेटणार नाही
मनाचा घोर
मनाला घोर लावणार्या गोष्टि
तु मात्र करु नकोस
मी नसलो तर काय झालं
तु मात्र हरु नकोस
मनाला घोर लावणार्या गोष्टि
तु मात्र करु नकोस
मी नसलो तर काय झालं
तु मात्र हरु नकोस
तुझ वागण
अजुन ही मला कळत नाही
तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन
तु माझ्या कडे का मागतेस
अजुन ही मला कळत नाही
तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन
तु माझ्या कडे का मागतेस
वागणं
अस कस?
तुझ वागणं
मझ्यावर रुसणं
अन खुद्कन हसणं
आधार
अलगद का होईना
तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास
काहि काळ का असो
माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास
तू माझी
त्या दिवशी तु फक्त माझी
आणि माझी झाली होतीस
कमरेला माझ्या हात घालून
जेंव्हा तू घट्ट बिलगली होतिस
आपले
अजुन तरी काहीच नव्हते
तुझे माझे म्हणण्या जोगे
सर्व काही आपले होते
एकत्र प्रेम करण्या जोगे
तुझे नाव
आज ही माझी सकाळ
तुझे नाव घेऊन होते
आणि तुझ्याच स्वप्नां मध्दे
माझी सर्व रात्र जाते
प्रेमळ हाथ
डबडबलेल्या आसवानां बाहेर येण्या साठी
पापण्या मिटाव्या लागतात
ते अश्रु टीपण्या साठी
प्रेमळ हाथच असावे लागतात
लाट
सागरची प्रत्येक लाट
माझ्या ओळखिची होति
कारण ती त्याच्या येवढिच
माझीही होती
अलगद
अलगद धरलेला हात तू
अलगदच सोडला होतास
आणि स्वप्नात बांधलेला संसार
तू अलगदच मोडला होतास
तारुण्य
गवतावरील दव-बिंदू
म्हणजे तुझे तारुण्य
तुझी मीठी म्हणजे
प्रेमाचे अरण्य
हृदय
तुझे नाव घ्यायला आता मला
माझया ह्रदयाला विचारव लागतय
बघितलस माझ हृदय ही आता
अगदी तुझया सारखच वागतय
वळण
त्या वळणावर मी तुला
पुन्हा वळून पाहिले
काय करू तुला पहिल्या शिवाय
नाही राहवले
पापनी
तुज्या डोळ्याना पाहिल्यावर
मला शिंप्ल्यांची आठवण यायची
तुझी पापनीही तुझया डोळ्याना
अगदी मोत्यासारखी जपायची
मिठी
त्या दिवशी ची सर्वे कामे
मी अलगद केली होती
जाताना मी मात्र तुला
घट्ट मिठी मारली होती
चुक
तू जेव्हा चुक केलिस
मी तुला माफ केल
मी जेव्हा चुक केली
तू म्हणालिस पाप केल
- सागर
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
Post a Comment Blogger Facebook