नाही विसरू शकत मी तुला,
तुझ्या सहवास क्षणांना ,
तुझ्या गोड आठवणींना ...
पानगळ कधीच झालेली
तुझ्या जाण्याने...
मी बसलेय कुरवाळत त्या
पाचोळ्याला...
बघत पान विरहीत वृक्षाला....
सांज येते गारठा वाठतो
तु नसतोस शाल बनायला...
तुझी आठवण येते नकळत
आपसुकच उब जाणवते तुझ्या मिठीची....
चांदण्या हासतात... चंद्र खुणावतो...
लपंडावाच्या खेळात मला बोलावतो...
बघ... आलीच तुझी आठवण...
खेळुया कारे चांदण्या मोजण्याचा खेळ...
कित्येक ऋतु बदलले..
तरी मी तिथेच
पाचोळ्यांशी खेळत...
तुझ्या आठवणींशी गप्पा मारत...
नाही विसरू शकत मी तुला,
तुझ्या सहवास क्षणांना


 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top