खालील विडंबन म्हणजे, "मी माझा" प्रमाणे एका नव-याचे संक्षिप्त मनोगत "मी हिचा". 
आशा आहे  तुम्ही सर्व छान आस्वाद घ्याल.

बायकोने लाटणे फ़ेकले
तरी आवाज होत नाही,
ह्याचा अर्थ असा नाही
कि नव-याला ईजा होत नाही.

अशी एक बायको हवी
तोंड हे अंग नसलेली,
अशक्यातली गोष्ट आहे पण
देवाने आशा नाही सोडलेली.

तुला मी कधीही
वजन करायला लावत नाही,
कारण तुझ्या शरिराचा व्यास त्या
इवल्याशा मशिनवर मावत नाही.
 
जडावलेल्या पापण्या
मिटायला तयार होत्या,
तेव्हाच हिच्या घोरण्याच्या
सिमा पार होत होत्या.

Post a Comment Blogger

 
Top