मला विसरायचे आहे ,
मला विसरायचे आहे कि “माझे तुझ्यावर प्रेम आहे”,
असे मी तुला बोललो होतो,
आणि हेही विसरायचे आहे कि ,
त्याचे उत्तर तू नकारात दिले होते.…
मला विसरायचे आहे ..
मला विसरायचे आहे ..
कि तुझ्या नकारा नंतरहि आपल्यात काहीच बदलले नाही,
किंबहूना आपण आणखीनच जवळ आलो ,
मला विसरायचे आहे कि तू मला आणि मी तुला समजायला लागलो ,
मला आज काहीच समजून घ्यायचे नाही,
मला फक्त विसरायचे आहे....
मला विसरायचे आहे,
तो वेळ जेव्हा एक-मेकांशी बोलताना आपण वेळांचे भान हरपायचो,
मला विसरायचे आहे त्या वाटा ज्यांवर आपण एकत्र चाललो होतो,
मला हेही विसरायचे आहे कि ,
नंतर मी एकटाच कित्येक वेळ त्या वाटानवर तुझ्या पाउलखुणा पहात होतो,
मला विसरायचे आहे...
मला विसरायच्या आहेत त्या भेटी ,
जेव्हा समोरा- समोर असून आपल्या नजरा मिळाल्या नाहीत ,
आणि जेव्हा मिळाल्या तेव्हा आपल्याला काही बोलावे लागले नाही..
मला विसरायचे आहे...
मला विसरायचे आहे कि माझ्याकडे तुझ्या काही तसविरी आहेत,
आणि हेही कि त्या तसविरी मी कोठे जपून ठेवल्यात ते,
आणि हेही विसरायचे आहे कि...
त्याना मी तासं-तास न्याहाळायचो.........
मला विसरायचे आहे...
मला विसरायचे आहे कि...मी तुला विसरू शकत नाही...
सांग हे शक्य होईल का?
मी तुला विसरेन का...?
मला विसरायचे आहे...
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
Post a Comment Blogger Facebook