कॉमनवेल्थ गेम्सच्या गचाळ आयोजनामुळे सध्या भारताची बेअब्रू होत असतानाच, सध्या नेटविश्वात तसेच मोबाईलच्या महाजालात मात्र मनोरंजनाचा नवा खेळ रंगला आहे. ईमेल आणि मोबाईलचे इनबॉक्स कोटी कोटी कलमाडी जोक्सनी ओसंडून वाहत आहेत...
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्यातील जाहीर कार्यक्रमात सांगितलेला हा अफलातून जोक -
कॉमनवेल्थ गेम्सचा खेळखंडोबा झाल्याने आयोजन समितीच्या प्रमुखांनी स्टेडियममध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला...
परंतु दुर्दैवाने स्टेडियमचे छतच खाली कोसळले.
...........................
' दबंग ' चित्रपटातील ' मुन्नी बदनाम हुई ' या लोकप्रिय गीताचे कॉमनवेल्थ गेम्सच्या पार्श्वभूमीवर केलेले हे विडंबन...
शीला दीक्षित कलमाडींना -
दिल्ली बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए
सडके भी जाम हुई, कॉमनवेल्थ तेरे लिए...
.........................
अयोध्येचा निकाल आणि कॉमनवेल्थ गेम्सच्या भवितव्यावर मार्मिक भाष्य करणारा एसएमएस अयोध्या प्रकरणी आऊट ऑफ कोर्ट तडजोड झाली. वादग्रस्त जागी मंदिर बांधण्यास मुस्लिम समाज नेत्यांनी मान्यता दिली. फक्त त्यांची एकट अट होती - मंदिराचे बांधकाम कलमाडी आणि कंपनीने करावे.. !
.......................
दिल्लीच्या वीस वर्षीय युवकाने फेसबुकवर एका नवीन म्हणीची भर घातलीय...
A collapse a day keeps the athletes away ...
......................
ट्विटर या सोशल नेटवर्किग साइटवर आलेला अनोखा मेसेज...
Suresh Kalmadi must be the first choice if ISRO goes for trial and error experiments for manned space mission,"
.......................
रेन रेन गो अवे... या इंग्रजी बालगीताचे विडंबन करणारा हा लोकप्रिय एसएमएस...
"Rain rain go away,
Kalmadi wants to come out and play
( Lyrics by M.S. Gill, Sung by Mani Shankar Aiyar, Music by A.R. Rahman!" )
........................
आता ' बा बा ब्लॅकशीप... ' या इंग्रजी बालगीताचे हे विडंबन वाचा...
Ba ba Kalmadi, have you any shame.
No sir, No sir, we are having a Common Loot Game.
Crores for my partner, crores for the dame,
crores for me too, for spoiling India's name!"
.......................
वाचा हा आणखी एक भन्नाट एसएमएस
कॉमनवेल्थ गेम्समध्ये १०० मीटर धावण्याची रेस जेथे सुरू होईल, त्याठिकाणी बहुतेक कलमाडी आणि कंपनीचा बोर्ड लावलेला असेल. GO SLOW, MEN AT WORK...
.........................
संयोजन समितीचे सचिव ललित भानोत हेही टीकेच्या फे-यातून सुटलेले नाहीत.
"Sarah Palin knows more about world politics than Lalit Bhanot about hygiene,"
...........................
(ता.क. - तुमच्याकडेही काही आणखी भन्नाट कलमाडी जोक्स असतील, तर वाट कसली बघताय... आम्हाला पाठवून द्या !)
Post a Comment Blogger Facebook