कॉलेजला जाणार्या आम्ही चार चौघी
चार चौघीत तो मलाच शोधायचा
मला शोधणारी त्याची नजर
माझ्या नजरेला भिडण्याची वाट पहायचा .........
कधी मी हि अलगद नजर उचलून
न बघितल्या सारखं करायची
पण त्याच्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य
माझ्या मनातली गोष्ट ओळखून जायची
कॉलेज ते घर प्रवास एकटीचाच
त्याला चुकउन मी निघायची
पण केसातली बंड खोर फुले
रस्त्यात पडून त्याला सांगायची .............
कदाचित फुलांनाही त्याच प्रेम कळल असाव
म्हणूनच त्याला मनातल माझ्या कळत असाव
मनात काय आहे त्याला माहित होत
पण माझ मन मलाच कळत नव्हत .........
प्रेम तर माझे ही होते
हे तर त्याला हि ठाऊक होते
माझ्या लाजण्यातच
त्याच्या प्रश्नाचे उत्तर होते
सुरु झालेल्या खेळाचा
नियम एकच होता
नजरांच्या खेळात हृदयातील शब्द
ओठांवर आणून द्यायचा नव्हता
नजरेतील खेळ ते आमुचे
नजरांच्या पुढे जातच नव्हते
शब्द ही सारे आतुरलेले
ओठी येण्याच्या प्रतीक्षेत होते...
नजरेचा खेळ हा सारा
नजरांच्या सागरात बुडाला
राहिली शोधत नजर माझी
तो अचानक दिसेनासा झाला..
शोधत आहे नजर माझी..
त्याच्या परतण्याची
हृदयाचा ठोका चुकेपर्यंत
वाट पाहीन मी त्याची....नजरांच्या त्या खेळाची...
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.